India vs Australia 2nd Test Time, Live Streaming and Venue: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसरी कसोटी पिंक बॉल कसोटी सामना असणार आहे. डे नाईट खेळवला जाणारा कसोटी सामना उद्यापासून म्हणजेच ६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, भारतासाठी चांगली गोष्ट ही आहे की संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा परतला आहे, तर शुबमन गिलही दुखापतीतून सावरला आहे. म्हणजे संपूर्ण संघ पूर्णपणे तंदुरुस्त आणि खेळण्यासाठी तयार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाने देखील पहिल्या कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे. पण डे नाईट असलेला दुसरा कसोटी सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार, जाणून घेऊया.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल कसोटी असणार आहे. पण या सामन्याची वेळही बदलली आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५० वाजता सुरू झाला होता. पण दुसरा कसोटी सामना हा आता सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. जेव्हा भारतात कसोटी सामना असतो तेव्हा दिवसाचे सामने ९.३० वाजता सुरू होतात. आता ऑस्ट्रेलियात हा सामना डे नाईट टेस्ट असल्याने दुपारी २.३० वाजता सुरू होणार आहे. भारतात हा सामना सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी साडेचार पर्यंत असेल. त्यावेळी ऑस्ट्रेलियात रात्र झालेली असेल.
हेही वाचा – IND vs AUS: अॅडलेड कसोटीत सलामीला कोण उतरणार? रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, “मी कुठेतरी… “
ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघ दुसऱ्यांदा डे-नाईट टेस्ट खेळणार
भारतीय संघ फारसे डे-नाईट कसोटी सामने खेळत नाही. भारतीय संघ आपल्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदा विदेशी भूमीवर दिवस-रात्र कसोटी खेळताना दिसणार आहे. भारताने पहिली पिंक बॉल कसोटी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळली होती. त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पण घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या तीनही गुलाबी चेंडूच्या कसोटी भारताने जिंकल्या आहेत. इतकंच नाही तर टीम इंडियाने या मालिकेतील पहिला सामना रोहित शर्मा आणि शुबमन गिलशिवाय जिंकला आहे, त्यामुळे संघाचे मनोबल उंचावले आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया अॅडलेड कसोटी किती वाजता सुरू होणार?
दुसरा कसोटी सामना हा भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. पहिले सत्र ९.३० ते ११.३० या वेळेत असेल. यानंतर ११.३० ते १२.१० या वेळेत लंच ब्रेक होईल. त्यानंतर १२.१० ते २.१० दुसरे सत्र असेल. त्यानंतर २० मिनिटांचा टी-ब्रेक असेल आणि २.३० ते ४.३० असे तिसरे सत्र खेळवले जाईल. भारत ऑस्ट्रेलियामधील हा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर पाहता येईल तर डिस्ने प्लस हॉटस्टारवर लाईव्ह टेलिकास्ट असेल.