Why are Australian players wearing black armbands in Adelaide Test: बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीमधील (BGT 2024-25) दुसरा कसोटी सामना ॲडलेडमधील ओव्हल मैदानावर खेळवला जात आहे. या डे-नाईट कसोटीची टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल सलामीसाठी उतरले होते, पण त्यांची सुरुवात फारशी चांगली झाली नाही आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर मिचेल स्टार्कने यशस्वी जैस्वालला पायचीत करत बाद केले. टीम इंडियाने या सामन्यात 3 बदलांसह उतरली आहे. पण याचबरोबर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ हातावर काळ्या पट्टी बांधून उतरला आहे, पण यामागचं नेमकं कारण काय, जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्मा, शुबमन गिल आणि रविचंद्रन अश्विन भारतीय संघात परतले आहेत, तर देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघाबाहेर पडावे लागले आहे. तर कांगारू संघ फक्त एका बदलासह उतरला आहे. दुखापतग्रस्त जोश हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलँडला संधी मिळाली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाच्या हातावर बांधलेल्या काळ्या पट्टीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा – IND vs AUS 2nd Test: ठरलं! रोहित शर्मा ‘या’ क्रमांकावर फलंदाजीला उतरणार, भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल

नाणेफेकीनंतर ऑस्ट्रेलियन संघ दोन्ही संघांच्या राष्ट्रगीतासाठी मैदानात येताच कांगारू खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. शोक व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी खेळाडू सामन्यांदरम्यान ही काळी पट्टी बांधतात. संघाचा युवा फलंदाज फिलिप हयूजच्या स्मरणार्थ ऑस्ट्रेलियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले आहेत. १० वर्षांपूर्वी देशांतर्गत सामन्यात डोक्याला चेंडू लागल्याने संघाचा युवा फलंदाज फिलिप ह्यूजचा मृत्यू झाला होता, जेव्हा तो अवघ्या २५ वर्षांचा होता.

हेही वाचा – IND vs AUS: रोहित शर्माचे पत्रकार परिषदेत ड्रेसिंग रूममधील मतभेदांवर स्पष्ट उत्तर, दुसऱ्या कसोटीपूर्वी म्हणाला…

फिलिप ह्यूजच्या मृत्यूच्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला होता. ही घटना आजही ऑस्ट्रेलियन संघ किंवा क्रिकेटविश्वातील इतर खेळाडू आणि चाहते विसरलेले नाहीत. याशिवाय ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान रेडपाथ यांचे १ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते आणि कांगारू संघाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठीही हातावर काळी पट्टी बांधली आहे.

हेही वाचा – Harry Brook Century: हॅरी ब्रूकची शतकाची परंपरा कायम, डॉन ब्रॅडमन यांचा मोडला विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज

रेडपाथ यांनी १९६४ ते १९७६ दरम्यान ऑस्ट्रेलियाकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळले. आपल्या ६६ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने ८ शतकं आणि ३१ अर्धशतकांच्या मदतीने ४८३७ धावा केल्या, तर केवळ ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ४६ धावा केल्या. तर दिवंगत फिलिप ह्यूजने ऑस्ट्रेलियासाठी २६ कसोटी, २५ एकदिवसीय आणि फक्त एक टी-२० सामना खेळला. त्याच्या नावावर एकूण ५ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये १५३५ धावा आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८२६ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus why are australian players wearing black armbands in adelaide test bdg