IND vs AUS Nitish Reddy revelation about the celebration : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेलबर्न कसोटीच्या तिसऱ्या दिवशी नितीश कुमार रेड्डीने शतक झळकावून आपले नाव इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदवले. शतक पूर्ण केल्यानंतर, तो गुडघ्यावर बसला, त्यानंतर हेल्मेट बॅटवर ठेवले. त्याची सेलिब्रेशन करण्याची पद्धत सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्याच्यासह टीम इंडियाचा संपूर्ण डगआऊट या ऐतिहासिक खेळीने उत्साहित झाला होता. आता नितीश कुमार रेड्डीने असं सेलिब्रेशन का केलं? याबाबत स्वत: खुलासा केला आहे.

नितीश कुमार रेड्डीने तिसऱ्या दिवशी वॉशिंग्टन सुंदरसोबत १२८ धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. यामध्ये सुंदरने ५० धावांचे योगदान दिले. यानंतर नितीशने अवघ्या १७३ चेंडूत पहिले कसोटी शतक झळकावलं. नितीशने १८९ चेंडूचा सामना करताना ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११४ धावांची झुंजार खेळी साकारली. त्याने शतक झळकावल्यानंतर खास पद्धतीने सेलिब्रेशन केले, ज्याने भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या त्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

google year in search for pakistan
Top Searches in Pakistan 2024: पाकिस्तान २०२४ मध्ये गुगलवर काय शोधत होता? वाचा गुगल सर्च रिपोर्टची सविस्तर यादी!
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Jasprit Bumrah Nominated for t20 ICC Trophies of 2024 Test Cricketer Of The Year and Mens Cricketer Of The Year
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहच्या कामगिरीची ICCने घेतली दखल, एक नव्हे तर दोन मोठ्या पुरस्कारांसाठी केलं नामांकित
jahnavi killekar wash mother in law feet and perform pooja
Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”
IND vs AUS Virat Kohli I am your father Australian newspaper crossed all limits
Virat Kohli : ‘विराट, मी तुझा बाप…’, ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने ओलांडली निर्लज्जपणाची सीमा, भारतीय चाहत्यांचा चढला पारा

नितीश रेड्डीचा सेलिब्रेशनबाबत खुलासा –

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नितीश रेड्डीने त्याच्या खास सेलिब्रेशनचे कारण स्पष्ट केले आहे. तो म्हणाला की, “शतक पूर्ण केल्यानंतर मी बॅट जमीनीवर उभा केली. त्यानंतर बॅटवर हेल्मेट ठेवले. कारण हेल्मेटवर तिरंगा आहे आणि मी तिरंग्याला सलाम करत होतो. देशासाठी खेळण्याची भावना हा प्रेरणाचा सर्वात मोठा स्रोत आहे.”

हेही वाचा – Virat Kohli : ‘विराट, मी तुझा बाप…’, ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने ओलांडली निर्लज्जपणाची सीमा, भारतीय चाहत्यांचा चढला पारा

जेव्हा २१ वर्षीय युवा नितीश कुमार रेड्डीने आपले शतक पूर्ण केले, तेव्हा मोहम्मद सिराज नितीशबरोबर फलंदाजी करत होता. सिराजनेही आपल्या युवा सहकाऱ्याचे शतक पूर्ण होण्यासाठी आपली विकेट टिकवून धरली होती. त्याचबरोबर तो नितीशचे मनोबलही वाढवत होता. सिराजच्या कंपनीबाबत बोलताना नितीश रेड्डी म्हणाला,”सिराज नेहमीच उत्साहाने भरलेला असतो. तो मला सांगत होता, ‘मी नक्कीच शतक पूर्ण करेन.’ त्याचा आत्मविश्वास गगनाला भिडला होता, मला त्याला पाहून चांगले वाटतं होते.”

Story img Loader