Rohit Sharma press conference: इंदोरमध्ये खेळली गेलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील तिसरी कसोटी सुमारे अडीच दिवसांत संपली. या मालिकेत प्रथमच भारतीय संघाचा पराभव झाला असून या सामन्यातील पराभवामुळे रोहित शर्माच्या कर्णधारपदाला धक्का बसणार आहे. टीम इंडियाचे स्वप्न होते की इंदोर कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडिया आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान काबीज करेल, तर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही प्रवेश करेल, पण ते पूर्ण होऊ शकले नाही. त्याचे असे झाले की, पहिले दोन सामने गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिला आणि मालिकेतील तिसरा सामना जिंकून संघाने अंतिम फेरीतही आपले स्थान पक्के केले. दरम्यान, सामना हरल्यानंतर कर्णधार रोहितच्या चेहऱ्यावर कुठेतरी वेदना दिसत होत्या.
पहिल्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी चांगली नव्हती
कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा तुम्ही कसोटी गमावता तेव्हा अनेक त्रुटी बाहेर पडतात. पहिल्या डावात आम्ही चांगली धावसंख्या केली नाही हे रोहित शर्माने मान्य केले. यानंतर पहिल्या डावात ८८ धावांनी मागे असताना आम्हाला दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करावी लागली. पण दुर्दैवाने आपण ते करू शकलो नाही.” वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलबाबत रोहित शर्मा म्हणाला की, अहमदाबादमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल आम्ही अजून विचार केलेला नाही. दरम्यान, आपण काय चूक केली आणि आपण कुठे चुकलो याचा विचार आणि समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला आणखी कुठे सुधारणा करायची आहे याचाही विचार करावा लागेल.”
कर्णधार रोहित पुढे म्हणाला की, “तुम्हाला आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर आणखी चांगली कामगिरी करावी लागेल. पण आम्ही बहुधा त्यांना पुन्हा पुन्हा संधी दिली, म्हणजे ऑस्ट्रेलियाला एकाच ठिकाणी खायला दिले. तसेच रोहित शर्माने सांगितले की, पहिल्या दोन सामन्यांच्या फलंदाजीतून आपण काहीतरी शिकू शकतो. तो म्हणतो की, एका सामन्यात आपण खराब खेळू शकतो. आम्हाला काही खेळाडूंनी विजयापर्यंत नेण्याची आम्हाला इच्छा होती आणि अपेक्षा होती, पण तसे झाले नाही, त्यामुळे आम्ही सामन्यात मागे पडलो आणि शेवटी हरलो.”
खेळपट्टीवरील प्रश्नावर रोहित शर्माने टीकाकारांना सुनावले
रोहित शर्मा म्हणाला, “आता भारताबाहेरही कसोटी सामने पाच दिवस चालत नाहीत. काल दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामना तीन दिवसांत संपला. पाकिस्तानमध्ये लोक कसोटी सामन्यांना कंटाळवाणे म्हणत आहेत, आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये तीन दिवसात संपवून अधिक रंजकता आणत आहोत. अशा खेळपट्टीवर खेळणे हा सामूहिक निर्णय होता. फलंदाजांसाठी हे आव्हानात्मक असेल हे आम्हाला माहीत होते, पण आम्ही अशा आव्हानांसाठी तयार आहोत.”
पुढे बोलताना तो म्हणाला की, “ उस्मान ख्वाजा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि आता देखील इतर फलंदाजांनी अतिशय सुंदर फलंदाजी केली. तसेच नॅथन लायनने सर्वाधिक ८ विकेट्स घेत शानदार गोलंदाजी केली. याकडे देखील तुम्ही सर्वांनी पाहणे गरजेचे आहे. वरच्या फळीतील किंवा खालच्या फळीतील कोणीही चांगली फलंदाजी केली तरी ती संघासाठी उपयुक्त असून ते महत्वाचे योगदान आम्ही मानतो कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.”