IND vs AUS Match Highlight: भारताच्या विश्वचषक २०२३ च्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सलामीच्या लढतीत केएल राहुलची धडाकेबाज खेळी भाव खाऊन गेली शिवाय भारताला विजयी करण्यात सुद्धा महत्त्वाची ठरली. २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या दोन षटकांत भारत २/३ अशा स्थितीत होता मात्र राहुलने लय धरली आणि विराट कोहलीसह महत्त्वपूर्ण भागीदारी करून भारताला सहा विकेट्ससह विजय मिळवून दिला. के.एल राहुलने कालच्या सामन्यात भारतासाठी विजयी षटकार मारला पण त्यानंतर राहुल मैदानावरच काहीसा नाराज व शॉक झालेला दिसून आला. त्याचे हे हावभाव सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले. शेवटी मॅचनंतर राहुलनेच स्वतः आपल्या प्रतिक्रियेबाबत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IND vs AUS जिंकूनही के.एल. राहुल नाराज का?

४२व्या षटकात, भारताने लक्ष्य गाठले तेव्हा राहुल ९१ धावांवर होता. भारताला विजयासाठी पाच धावांची गरज होती. आणि राहुलला केवळ एक चौकार आणि षटकारासह सातवे शतक गाठता आले असते. यावेळी राहुलने कव्हर ड्राईव्ह वरून चौकार मारण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा वेग जास्त असल्याने चेंडू थेट सीमापार गेला आणि तो षटकार ठरला. या शॉटसह भारत विजयी झाला असला तरी राहुलला शतक पूर्ण करता आले नाही म्हणून तो काहीसा नाराज झाला होता पण नंतर तो संघाचा खेळाडू म्हणून या विजय सुद्धा सेलिब्रेट करताना दिसून आला.

के. एल. राहुल म्हणाला की, “मला एक चौकार व मग एक षटकार खेळायचा होता पण मी तो चेंडू जास्तच चांगला मारला आणि माझं शतक हुकलं. पण ठीक आहे, पुन्हा कधी तरी ही संधी पुन्हा येईल. “

IND vs AUS World Cup Match Highlights:

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना शून्यावर माघारी पाठवल्यानंतर विराट कोहली (८५) व के. एल. राहुल (९७) धावांसह भारताचे तारणहार ठरले. दुसरीकडे गोलंदाजी मध्ये रवींद्र जडेजा (३/२८), कुलदीप यादव (२/४२) आणि रविचंद्रन अश्विन (१/३४) जसप्रीत बुमराह (२ /35), मोहम्मद सिराज (1/26) आणि हार्दिक पंड्या (1/28) यांनी ऑस्ट्रेलियाला 110/3 अशी स्थिती असतानाही 49.3 षटकात सर्वबाद 199 पर्यंत खाली आणलं.