Shubman Gill Will Be More Dangerous For Australia in Final : एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये भारतीय संघाची रणनीती आतापर्यंत खूप प्रभावी ठरली आहे आणि हा संघ कठोर योजनेनुसार खेळत आहे. भारतीय फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर एकीकडे या संघाचे दोन्ही अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली आपल्या भूमिकेला न्याय देत फलंदाजी करत आहेत, तर संघाचे इतर फलंदाजही त्यांच्या देखरेखीखाली सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. आता अहमदाबादमध्ये खेळल्या जाणार्‍या अंतिम सामन्यातही रोहित आणि कोहलीकडून अपेक्षा असतील, पण नरेंद्र मोदी स्टेडियमवर कांगारू संघासाठी या दोघांपेक्षाही धोकादायक ठरू शकणारा फलंदाज शुबमन गिल आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुबमन गिलसाठी अहमदाबाद ठरले आहे खास –

अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलसाठी आतापर्यंत खूप खास राहिले आहे. शुबमन गिल अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये मोठा आणि निर्णायक फरक करू शकतो. कारण त्याची आकडेवारीही याची साक्ष देत आहे. गिलने अहमदाबादमधील कसोटी आणि टी-२० सामन्यांमध्ये ७३.०० च्या सरासरीने ४ शतके झळकावून ९४९ धावा केल्या आहेत. आता विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची पाळी आहे. सध्या गिलचा फॉर्मही चांगला असून तो उपांत्य फेरीतही ८० धावा करून नाबाद राहिला होता. त्यामुळे या मैदानावर त्यालाही संधी आहे.

हेही वाचा – IND vs AUS Final: एअर शोपासून प्रीतमच्या परफॉर्मन्सपर्यंत, फायनलच्या दिवशी कोण-कोणते कार्यक्रम होणार? बीसीसीआयने दिली माहिती

शुबमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्यामुळे नरेंद्र मोदी स्टेडियम त्याच्यासाठी होमग्राऊंड आहे. त्याने या मैदानावर आतापर्यंत ७ डावात ६७.३३ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या आहेत, ज्यात दोन शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील याच मैदानावर गिलने मुंबई इंडियन्सविरुद्ध ६० चेंडूत १२९ धावा केल्या होत्या. तसेच लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध ५१ चेंडूत नाबाद ९४ धावांची शानदार खेळी केली होती.

हेही वाचा – Mohammed Shami: योगी सरकारने घेतला मोठा निर्णय! मोहम्मद शमीच्या गावात बांधले जाणार स्टेडियम

याच मैदानावर गिलने केवळ आयपीएलमध्येच नव्हे, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पहिले शतक झळकावले आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध ५९ चेंडूत १२६ धावांची खेळी साकारली होती. त्याचबरोबर मार्चमध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२३ दरम्यान त्याने कसोटी शतकही झळकावले आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२८ धावा केल्या आहेत. अहमदाबाद स्टेडियमवर तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये आणि कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे येथे मोठी धावसंख्या करण्याची क्षमता असल्याचे गिलने दाखवून दिले आहे. गिलने या विश्वचषकात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ८ सामन्यात ४९.४२ च्या सरासरीने ३४६ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus world cup 2023 final not only virat rohit also shubman gill will be more dangerous for australia vbm
Show comments