India vs Australia, World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील पाचवा सामना यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. या सामन्यात भारतीय गोलंदाजापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ १९९ धावांत लोटांगण घातले. त्यानंतर भारताची सुरुवात खूपच खराब झाली असती. दोन धावांवर तीन विकेट्स अशी असताना विराट कोहली आणि के.एल. राहुल यांनी अडचणीतून बाहेर काढत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. या दोघांनी १६५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला विजयाच्या दिशेने नेले. यानंतर राहुल आणि हार्दिक पांड्या यांनी शानदार चौकार-षटकार मारून लवकर सामना संपवला. सहा गडी राखून भारताने या स्पर्धेचा विजयाने श्री गणेशा केला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला
भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा गडी राखून पराभव करत विश्वचषक स्पर्धेतील विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारताच्या विजयाचे नायक लोकेश राहुल आणि विराट कोहली होते. मात्र, दोन्ही फलंदाजांचे शतक हुकले. राहुलने ९७ धावांची नाबाद खेळी तर कोहलीने ८५ धावांची खेळी खेळली. या दोघांशिवाय फक्त हार्दिक पांड्याला खाते उघडता आले. त्याने ११ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेझलवूडने तीन आणि मिचेल स्टार्कने एक विकेट घेतली. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक ४६ धावा केल्या. वॉर्नरनेही ४१ धावांची खेळी खेळली. अखेरीस स्टार्कने २८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. या सामन्यातील विजयासह भारताने दोन महत्त्वाचे गुण मिळवले आहेत. टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आली आहे. भारताचा पुढील सामना ११ ऑक्टोबरला अफगाणिस्तानशी होणार आहे.
काय घडलं मॅचमध्ये?
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बुमराहने आपल्या दुसऱ्याच षटकात मिचेल मार्शला बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. यानंतर स्मिथ आणि वॉर्नरने ६९ धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळला, मात्र कुलदीपने वॉर्नरला बाद करून ही भागीदारी मोडीत काढली. वॉर्नरने ४१ धावा केल्या. स्मिथ आणि लाबुशेनने ३६ धावांची भर घातली, पण जडेजाने स्मिथला ४६ आणि लाबुशेनला २७ धावांवर बाद केले. त्यांनी अॅलेक्स कॅरीला खातेही उघडू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ ११९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. १५ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर कुलदीपने मॅक्सवेलला बोल्ड केले. लवकरच ग्रीनही आठ धावांवर अश्विनचा बळी ठरला. कमिन्स १५ धावा करून बाद झाला तर झाम्पा सहा धावा करून बाद झाला. अखेरीस मिचेल स्टार्कने २८ धावा करत संघाची धावसंख्या १९९ धावांपर्यंत नेली. भारताकडून रवींद्र जडेजाने तीन विकेट घेतल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. सिराज, हार्दिक आणि अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
२०० धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खूपच खराब झाली. दोन धावांवर तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. इशान किशन, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. स्टार्कने इशान किशनला तर हेजलवूडने रोहित आणि श्रेयसला आपला बळी बनवले. यानंतर राहुलसह कोहलीने डावाची धुरा सांभाळली. त्याला १२ धावांवर जीवदान मिळाले. यानंतर दोघांनीही मागे वळून पाहिले नाही. दोघांनी आपापली अर्धशतकं झळकावली आणि शतकी भागीदारी केली. यानंतरही तो क्रीजवरच राहिला. कोहलीचे शतक हुकले आणि ८५ धावांवर तो हेजलवुडचा तिसरा बळी ठरला. यानंतर राहुलने हार्दिक पांड्यासोबत सामना संपवला. मात्र, त्याचे शतकही हुकले आणि ९७ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर तो नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियातर्फे हेजलवूडने तीन आणि स्टार्कने एक विकेट घेतली.