AB de Villiers saya I have never seen Ajinkya Rahane move so well: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत ओव्हलवर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दोन दिवशी ऑस्ट्रेलियाने शानदार प्रदर्शन केले होत. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. परंतु तिसऱ्या दिवशी अजिंक्य रहाणे, शार्दुल ठाकुर आणि रवींद्र जडेजाने उत्कृष्ट कामगिरी करत भारताचे सामन्यात पुनरागमन केले. भारताच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणे सर्वाधिर ८९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर एबी डिव्हिलियर्ससह अनेकांनी रहाणेचे कौतुक केले.
अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये खेळलेल्या खेळीचे खूप कौतुक होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने अजिंक्य रहाणेच्या तंत्राचे कौतुक केले आहे. त्याने ट्विट करून रहाणेच्या तंत्राचे कौतुक केले आणि सांगितले की, रहाणे इतका चांगला मूव्ह करत असल्याचे मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.
प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रहाणेने कठीण काळात शानदार खेळी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येसमोर भारताचा फॉलोऑन टाळण्यात मोलाची भूमिका बजावली. तो शतकापासून हुकला पण त्याने ८९ धावांची शानदार खेळी खेळली ज्यात ११ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याच्या आणि शार्दुल ठाकूर (५१) यांच्यातील १०९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी घेण्यापासून रोखले.
एबी डिव्हिलियर्सकडून अजिंक्य रहाणेचे कौतुक –
अजिंक्य रहाणेच्या तंत्राबाबत प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्या ट्विटला एबी डिव्हिलियर्सने उत्तर दिले. तो म्हणाला, “मी अजिंक्य रहाणेला इतकी चांगली हालचाल करताना कधीच पाहिले नाही. त्याचे तंत्र जबरदस्त आहे आणि तो उशीरा खेळत आहे.”
माजी क्रिकेटर आकाश चोप्रानेही अजिंक्य रहाणेच्या तंत्रावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, “अजिंक्य रहाणेने आपले तंत्र थोडे बदलले आहे. त्याचे दोन्ही पाय क्रीजच्या आत आहेत, तो उशिरा खेळत आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण तो अजिबात पुढे जात नाही. मी ५०-५० टक्के त्याच्यासोबत आहे. पण मला १०० टक्के खात्री नाही की खेळण्याचा हा योग्य मार्ग आहे.”