Basit Ali criticizes Rahul Dravid, he is zero as a coach: सध्या भारतीय संघ लंडनमधील ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. या सामन्याला तीन दिवस पूर्ण झाले असून आतापर्यंत टीम इंडिया बॅकफूटवर दिसली आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू बासित अलीने राहुल द्रविडवर जोरदार टीका केली आहे.
बासित अली म्हणाला की, प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड पूर्णपणे झिरो आहे. वरचा अक्कल वाटत असताना राहुल द्रविड कुठे डोंगरामागे लपला होता. आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला, “नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्या दोन तासांच्या चिंतेने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत असतानाच भारताने सामना गमावला. ज्या प्रकारची गोलंदाजी पाहिली ती आयपीएलसारखी होती. लंचपर्यंत भारतीय गोलंदाज इतके आनंदी दिसत होते की जणू त्यांनी सामना जिंकला आहे.”
माजी पाकिस्तानी क्रिकेटर पुढे म्हणाला, “भारत आता एकच करू शकतो की त्यांना स्वस्तात बाद करणे आणि चौथ्या डावात चमत्काराची आशा करणे. भारताने मैदानात उतरलेल्या १२० षटकांमध्ये मला फक्त २-३ खेळाडू तंदुरुस्त दिसले रहाणे, कोहली आणि जडेजा. बाकी सगळे थकलेले दिसत होते.”
हेही वाचा – IND vs AUS WTC Final: ‘मला तुझा अभिमान आहे…’; अजिंक्य रहाणेच्या पत्नीने सोशल मीडियावर लिहिला प्रेमळ संदेश
प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड झिरो – बासिल अली
माजी पाकिस्तानी खेळाडू बासित अली पुढे म्हणाला, “मी राहुल द्रविडचा खूप मोठा चाहता आहे, नेहमीच होतो आणि राहणार आहे. तो एक क्लास खेळाडू आहे, एक दिग्गज आहे. पण प्रशिक्षक म्हणून तो पूर्णपणे झिरो आहे. तुम्ही भारतासाठी टर्निंग खेळपट्ट्या तयार केल्या. फक्त मला एक उत्तर द्या. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना अशाच विकेट्स होत्या का? त्याच्याकडे उसळत्या खेळपट्ट्या होत्या, नाही का? तो काय विचार करत होता देव जाणे. जेव्हा वरचा शहाणपण वाटत होता, तेव्हा तो डोंगराच्या मागे कुठे लपता होता माहित नाही.”
सामन्याबद्दल बोलायचे, तर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुरच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात २९६ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या दुसऱ्या डावात ७० षटकांनंतर ६ बाद २०१ धावा केल्या आहेत. या धावसंख्येच्या जोरावर ऑस्ट्रेलिया संघाकडे सध्या ३७४ धावांची आघाडी आहे.