IND vs AUS 4th Test Yashasvi Jaiswal break Virender Sehwag Record : मेलबर्नच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा १८४ धावांनी धुव्वा उडवत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. या सामन्यात यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त इतर सर्व फलंदाजांनी साफ निराशा केली. त्याने दुसऱ्या डावात ८४ धावांची खेळी साकारत माजी वीरेंद्र सेहवागचा १६ वर्षांपूर्वीचा खास विक्रम मोडला. त्याचबरोबर यशस्वाने महान खेळाडू सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जैस्वालने मोडला वीरेंद्र सेहवागचा विक्रम –

या वर्षी यशस्वी जैस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याने यंदाच्या वर्षी १४७८ धावा केल्या आहेत. एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा भारतीय फलंदाजाच्या यादीत तिसऱ्या क्रमाकांवर पोहोचला. त्याने वीरेंद्र सेहवागचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत हे स्थान पटकावले आहे. सेहवागने २००८ मध्ये १४६२ आणि २०१० मध्ये १४२२ धावा केल्या होत्या.

जैस्वालने सचिनच्या विक्रमाची केली बरोबरी –

यंदा यशस्वी जैस्वालचा कसोटी क्रिकेटमधील दबदबा स्पष्टपणे दिसला आहे. प्रत्येक मालिकेत त्याची बॅट तळपली आहे. यावर्षी सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत यशस्वी जो रूटनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच त्याच्या बॅटमधून एकूण १२ वेळा ५०हून अधिक धावा आल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्करच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या यादीत वीरेंद्र सेहवागचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१० मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये एकूण १३ वेळा ५०हून अधिक धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs AUS : ऋषभ पंत आऊट झाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडचे वादग्रस्त सेलिब्रेशन, विराटप्रमाणे होणार का कारवाई?

भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावांची खेळी करणारे खेळाडू :

वीरेंद्र सेहवाग – १२ (वर्ष २०१०)
यशस्वी जैस्वाल – १२ (वर्ष २०२४)
सचिन तेंडुलकर – १२ (वर्ष २०१०)
सुनील गावस्कर – १२ (वर्ष १९७९)
गुंडप्पा विश्वनाथ – ११ (वर्ष १९७९)
मोहिंदर अमरनाथ – ११ (वर्ष १९८३)

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus yashasvi jaiswal surpasses virender sehwag to equal sachin tendulkar record in test at melbourne vbm