इंदूर कसोटी सामन्यात मयांक अग्रवालने झळकावलेल्या धडाकेबाज द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने आपली पकड मजबूत केली आहे. मयांकने सर्वात प्रथम अजिंक्य रहाणेच्या साथीने भागीदारी रचत भारतीय डावाला आकार दिला. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत मयांकने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत धावा काढल्या. मेहदी हसनच्या गोलंदताजीवर १९६ धावांवर खेळत असताना मयांकने खणखणीत षटकार खेचत आपलं द्विशतक साजरं केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – IND vs BAN : मयांकचं द्विशतक, अनोखी कामगिरी करणारा दुसरा भारतीय

कसोटी क्रिकेटमधलं मयांकचं हे दुसरं द्विशतक ठरलं. आपल्या आठव्या कसोटी सामन्यात मयांकने ही कामगिरी करुन दाखवली. सर्वात कमी कसोटी सामन्यांमध्ये दोन द्विशतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मयांक तिसऱ्या स्थानावर आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी आपल्या सातव्या कसोटी सामन्यात दुसरं द्विशतक झळकावलं होतं, मयांकने आपल्या आठव्या कसोटी सामन्यात ही कामगिरी करुन दाखवल्यामुळे ब्रॅडमन यांचा विक्रम थोडक्यात बचावला.

द्विशतक झळकावल्यानंतर मयांकने पुन्हा एकदा फटकेबाजी सुरु केली. मात्र मेहदी हसनच्या गोलंदाजीवर षटकार खेचण्याच्या प्रयत्नात अबु जायेदने सीमारेषेवर त्याचा झेल पकडला. मयांकने ३३० चेंडूचा सामना करत २४३ धावा केल्या, त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ८ षटकारांचा समावेश आहे. दरम्यान मयांकने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या सर्वोत्तम धावसंख्येचीही नोंद केली आहे.