भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना मीरपूर येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने ४१.२ षटकांत सर्वबाद १८६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशला १८७ धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान या सामन्यात शाकिब अल हसने रोहित आणि विराटला बाद करत एक मोठा पराक्रम केला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक गमावून फलंदाजी करताना शिखर धवनच्या (७) रूपाने संघाला पहिला धक्का बसला. तो डावाच्या सहाव्या षटकात बाद झाला. तेव्हा धावफलकावर केवळ 23 धावा झाल्या होत्या. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज शकिब अल हसनने पहिल्यांदा रोहितला बाद केले. त्यानंतर लगेच त्याच षटकात विराटला बाद केले. त्यामुळे भारतीय संघाला एकाच षटकात दुहेरी झटका बसला.

Bhuvneshwar Kumar with RCB in IPL 2025
Bhuvneshwar Kumar : आरसीबीने भुवनेश्वर कुमारसाठी उघडली तिजोरी, मूळ किमतीच्या दुप्पट किंमतीला केले खरेदी
asprit Bumrah become 2nd Indian fast bowler Captain to win the POM Award in Australia
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहची कमाल! ऑस्ट्रेलियात कर्णधार…
IND vs AUS India Big Records with the Historic win against Australia in perth test biggest win in SENA countries
IND vs AUS: भारताने कांगारूंचा पराभव करत विक्रमांची रांगच लावली, बुमराहच्या नेतृत्वाखाली SENA देशात केला भीमपराक्रम
WTC Points Table India Reclaim No 1 Spot With 295 Runs Win Over Australia in Perth Test BGT
WTC Points Table मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, पराभवासह ऑस्ट्रेलियाला दिला दुहेरी झटका
India Beat Australia in Perth test Jasprit Bumrah Yashasvi Jaiswal
IND vs AUS: भारताने भेदलं पर्थचं चक्रव्यूह! ऑस्ट्रेलियावर मिळवला ऐतिहासिक विजय; कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
IND vs AUS Team India's celebration after Travis Head's wicket
IND vs AUS : ट्रॅव्हिस हेडच्या विकेटनंतर टीम इंडियाचा एकच जल्लोष! बुमराह-विराट आक्रमक झाल्याचा VIDEO व्हायरल
IPL Auction 2025 Day 2 Live Updates in Marathi
IPL Mega Auction 2025 Live Updates: मुंबई इंडियन्सने चेन्नईला मागे टाकत दीपक चहरला घेतलं ताफ्यात, लावली तगडी बोली
Ivory Coast records lowest ever total after 264 run loss to Nigeria in mens T20 World Cup qualifier 2026
Ivory Coast : अख्खा संघ ७ धावात तंबूत! टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला असा प्रकार

बांगलादेशच्या डावातील ११वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाकीबने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ३ चेंडूतच तंबूत पाठवले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाकिबने रोहितला त्रिफळाचित केले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने विराटला एक्स्ट्रा कव्हरवर लिटन दासकडे झेलबाद केले. रोहितला २७ तर विराटला फक्त ९ धावा करता आल्या. शाकीबच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने ४९ धावांत ३ विकेट गमावल्या.

शाकीबने दुसऱ्यांदा केला हा पराक्रम –

हेही वाचा – T10 League 2022: आंद्रे रसेलने केला कहर; केवळ ११ चेंडूत कुटल्या ५२ धावा, पाहा व्हिडिओ

शाकिब अल हसनने विराट कोहली आणि रोहित शर्माला एकाच षटकात बाद करत वनडेत दुसऱ्यांदा ही कामगिरी केली. यापूर्वी २०१० मध्ये आशिया चषकाच्या एका सामन्यात त्याने १५ व्या षटकात ही कामगिरी केली होती. वनडे फॉरमॅटमध्ये रोहित आणि कोहलीला एकाच षटकात दोनदा बाद करणारा शाकिब हा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिबने ३६ धावांत ५ बळी घेतले. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ७३ धावा केल्या. तसेच ७ फलंदाज दुहेरी आकडा देखीव गाठू शकले नाहीत.