IND vs BAN 1st Test Bangladesh won the toss and decided to bowl : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने संघात कोणताही बदल केलेला नाही. बांगलादेशने ३ वेगवान गोलंदाजांसह जाण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशने तीन वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त दोन फिरकी अष्टपैलू खेळाडूंचा समावेश प्लेइंग इलेव्हनमध्ये केला आहे.

त्याचबरोबर भारताने ३ वेगवान गोलंदाज आणि २ फिरकी गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह, आकाशदीप, मोहम्मद सिराज, अश्विन आणि जडेजा यांचा भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सामन्यातून ऋषभ पंत प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करत आहे. २०२२ मध्ये झालेल्या भीषण कार अपघातात जखमी झाल्यानंतर पंत पहिल्यांदाच कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

AFG Vs SA Match Afghanistan Won
Afghanistan : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेला दणका; ६ विकेट्सनी विजय
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Tirupati Balaji Prasad Animal Fat Used Latest News
Tirupati Balaji Prasad : “तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर..”, चंद्राबाबू नायडूंचा माजी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Tanaji Sawant vs NCP
NCP vs Tanaji Sawant: ‘आता सत्तेतून बाहेर पडलेलं बरं’, विधानसभेआधीच महायुतीत धुसफूस; अजित पवार गटाचा इशारा
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…

तो ६३२ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ ​​च्या दृष्टिकोनातून टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. ७४ गुण आणि ६८.५२ पीसीटीसह भारत डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पहिल्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलिया ९० गुण आणि ६२.५० पीसीटीसह दुसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Afghanistan : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेला दणका; ६ विकेट्सनी विजय

भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

हेही वाचा – Gautam Gambhir : बुमराह, शमी, सिराजसाठी गोलंदाजी हीच ‘ध्यानधारणा व मन:शांती’, गौतम गंभीरचे वक्तव्य

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन: शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा.