बांगलादेश विरुद्ध भारत यांच्यात मालिकेतील पहिला कसोटी सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात भारतीय संघाने २९८ धावा करून दुसरा डाव घोषित केला आणि बांगलादेशला ५७२ धावांचे लक्ष्य दिले. या प्रचंड धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशने दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके झळकावत चांगली सुरुवात केली. अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ही जोडी उमेश यादवने आपल्या गोलंदाजीने फोडली. याशिवाय ऋषभ पंतनेही जोरदार झेल टिपला.

यावेळी भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव याने बांगलादेशच्या पहिल्या डावामध्ये चमकदार कामगिरी केली. त्याने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ४ आणि तिसऱ्या दिवशी १ विकेट घेतली. यामुळे त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा ५ बळी घेण्याची कामगिरी केली. यानंतर त्याने प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले दोन वर्षानंतर खेळत आहे, असे वाटत नाही.

Captain Rohit Sharma reacts after disappointing Adelaide Test performance by batsmen sports news
फलंदाजांची कामगिरी निराशाजनक, गोलंदाजीत बुमराला साथ आवश्यक! अॅडलेड कसोटीनंतर कर्णधार रोहितची प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Rohit Sharma Statement on India Defeat in Pink Ball Test Said we didnt play well enough to win the game
IND vs AUS: भारताने पिंक बॉल कसोटी गमावण्यामागचं रोहित शर्माने सांगितलं कारण, कोणाच्या डोक्यावर फोडलं पराभवाचं खापर?
Mohammed Siraj Travis Head fight after wicket in IND vs AUS 2nd test Video
VIDEO: सिराज आणि हेड लाईव्ह सामन्यातच भिडले, क्लीन बोल्ड झाल्याने हेड संतापला अन् सिराजनेही दाखवले डोळे
IND vs AUS Controversial Umpiring Over R Ashwin LBW Appeal as Mitchell Marsh Given Out KL Rahul DRS b
IND vs AUS: राहुल आऊट अन् मार्श नॉट आऊट, तिसऱ्या पंचांचा पुन्हा एकदा भारताविरूद्ध निर्णय; मैदानात नेमकं काय घडलं?
Kagiso Rabada Bat Broke in t20 parts on Lahiru Kumara Ball in SA vs SL 2nd Test Watch Video
SA vs SL: चेंडूच्या वेगासमोर बॅटचे झाले दोन तुकडे, थोडक्यात वाचला कगिसो रबाडाचा हात; VIDEO होतोय व्हायरल
Mitchell Starc Gets His Revenge Against Yashasvi Jaiswal After Being Called Slow Watch Video IND vs AUS
IND vs AUS: ‘स्लो बॉल?’ स्टार्कने पहिल्याच चेंडूवर जैस्वालला बाद करत घेतला बदला, पर्थमध्ये मारला होता टोमणा, पाहा VIDEO
IND vs AUS Why are Australian players wearing black armbands in Adelaide Test
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरूद्ध दुसऱ्या कसोटीत हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? काय आहे कारण?

भारताने पहिल्या डावातील २७४ धावसंख्येत २५८ धावांची अधिक भर घातली आणि बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानासमोर बांगलादेशचा संघ गंटांगळ्या खाईल असे वाटत होते, पण त्यांच्या ओपनर्सनी जबरदस्त खेळ केला. पण, उपाहारानंतर उमेश यादवने भारताला पहिली विकेट मिळवून दिली. विराट कोहलीकडून हा झेल सुटला होता, परंतु ऋषभ पंतने चपळाई दाखवली अन् शानदार झेल घेतला. कर्णधार केएल राहुलचा जीव भांड्यात पडला.

विराटच्या हातातून चेंडू निसटला, मग पंतने चपळाई दाखवत झेल पकडला

डावाच्या ४६व्या षटकापर्यंत बांगलादेशने एकही विकेट गमावली नाही आणि संघाचे दोन्ही सलामीवीर नझमुल हुसेन झाकीर हसन यांनी अर्धशतक झळकावले होते, त्यानंतर ४७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर उमेश यादवने नझमुल हुसेनला त्रिफळाचीत केले आणि चेंडूला स्पर्श झाला. त्याची बॅट थेट पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या हातात गेली पण त्याच्या हातातून ती निसटली. चेंडू खाली पडणारच होता तेव्हा यष्टिरक्षक ऋषभ पंतने उत्कृष्ट उडी मारत त्याचा झेल घेतला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि कर्णधार केएल राहुलही दोन मिनिटे पाहतच राहिला. यासह नजमुल हुसेन शांतो ६७ धावा करून बाद झाला.

तत्पूर्वी, भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर भारताने गुंडाळला. कुलदीपने १६-६-४०-५ अशी कामगिरी केली. मोहम्मद सिराजने दोन बळी घेतले, तर उमेश यादव अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. फॉलो ऑन न देता फलंदाजीचा सराव मिळावा या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या लोकेश राहुलला (२३) पुन्हा अपयश आले. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी ११३ धावांची भागीदारी केली. शुबमनने १५२ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ११० धावा केल्या. पुजारानेही १३० चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. भारताने दुसरा डाव २ बाद २५८ धावांवर घोषित करताना बांगलादेशसमोर ५१३ धावांचे लक्ष्य ठेवले.

हेही वाचा: Hockey World Cup: “येणाऱ्या पिढीसाठी हा विश्वचषक…”, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे मोठे विधान

चोथ्या दिवशी भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज गुडघे टेकतील असे वाटत होते, मात्र त्यांच्या सलामीवीरांनी शतकी भागीदारी रचत टीम इंडियाच्या गोलंदाजांना नाकेनऊ आणले. जाकिर हसन व नजमूल शांतो यांनी दमदार खेळ केला. पण, लंच ब्रेकनंतर उमेश यादवने भारताला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. उमेशने टाकलेला बाहेर जाणारा चेंडूवर नजमूलने फटका मारला, पण तो स्लीपला उभ्या असलेल्या विराटच्या दिशेने गेला. विराटकडून हा झेल सुटलेला. यष्टिरक्षक ऋषभने चपळाई दाखवून झेल टिपला अन् लोकेशचा जीव भांड्यात पडला. नजमूल व हसन यांनी पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली.

Story img Loader