IND vs BAN 1st Day 3 Highlights: भारत वि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना सध्या चेन्नई येथे खेळवला जात आहे. या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत ठेवली आहे. भारताने बांगलादेशला विजयासाठी तब्बल ५१३ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ५१३ धावांवर टीब्रेकपूर्वी डाव घोषित केला. बांगलादेशचा संघ फलंदाजी करत आहे. पण दिवसाचा खेळ संपण्यासाठी वेळ असतानाही पंचांकडून सामना मध्येच थांबवण्यात आला आणि काही वेळाने आजच्या दिवसाचा खेळ संपल्याचे पंचांनी घोषित केले.

बांगलादेशचा संघ ४ बाद १५८ धावांवर फलंदाजी करत होता. पण अचानक चेन्नईमधील हवामान बदलल्याने सामना थांबवण्यात आला. खराब हवामानामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकला नाही. संध्याकाळ जसजशी होत होती तसे काळे ढग मैदानात दाटून आले आणि मग खराब प्रकाशामुळे पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेशने दुसऱ्या डावात ४ गडी गमावून १५८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – VIDEO: रोहितने बोलता बोलता मुद्दाम शुबमनला मारलं, विराटने कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड होतंय सांगताच कॅप्टनने पाहा काय केलं?

IND vs BAN: भारत बांगलादेश कसोटीच्या तिसऱ्या दिवशी कोणी मारली बाजी?

सामना थांबवण्यापूर्वी मोहम्मद सिराजचे ३८वे षटक सुरू होते. त्याने दोन चेंडूही टाकले होते. खराब प्रकाशामुळे पंचांनी रोहित आणि संघाशी संवाद साधला की षटक पूर्ण करायचे असेल तर सिराजला ऑफस्पिन गोलंदाजी करावी लागली. यावर चर्चा करून सिराज ऑफस्पिन गोलंदाजीसाठी तयार होत होता पण तोपर्यंत हवामान खूपच खराब झाले होते आणि पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. आदल्या दिवशीही चेन्नईमध्ये पाऊस पडला होता आणि सकाळी सामना सुरू होण्यापूर्वी मैदानावर कव्हर्स होते. पण सामना सुरू असताना दिवसभर पावसाने कोणताही व्यत्यय आणला नाही. पण अखेरीस खराब प्रकाशामुळे सामना लवकर संपवावा लागला.

हेही वाचा – Rishabh Pant Century: ऋषभ पंतचे ६३३ दिवसांच्या कमबॅकनंतर दणदणीत शतक, थेट धोनीच्या विक्रमाची केली बरोबरी

IND vs BAN: ऋषभ पंत-शुबमन गिलच्या शतकांच्या जोरावर भारताने गाठली मोठी धावसंख्या

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यत भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३ गडी गमावून ८१ धावा केल्या होत्या. शुभमन गिल ३३ आणि ऋषभ पंतने १२ धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित होते. यानंतर तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी आपली शतके पूर्ण केली. पंतने १२८ चेंडूत १०९ धावा केल्या तर शुभमन गिलने १७६ चेंडूत नाबाद ११९ धावा केल्या. केएल राहुलने १९ चेंडूत २२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. भारताने दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला. अशा स्थितीत बांगलादेशला दुसऱ्या डावात ५१५ धावांचे लक्ष्य मिळाले.

हेही वाचा – IND vs BAN : शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद, भारताने बांगलादेशला दिले ५१५ धावांचे लक्ष्य

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली. सलामीवीर झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांच्यात पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी झाली. जसप्रीत बुमराहने ही भागीदारी तोडली आणि यशस्वी जैस्वालने झाकीर हसनचा गल्लीमध्ये अप्रतिम झेल घेतला. झाकीरने ४७ चेंडूत ३३ धावा केल्या. ८६ धावांवर बांगलादेशची दुसरी विकेट पडली. रविचंद्रन अश्विनने शादमान इस्लामला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने ६८ चेंडूत ३५ धावा केल्या. यानंतर अश्विनने मोमिनुल हक आणि मुशफिकुर रहीम यांना पॅलियनमध्ये पाठवले.

कर्णधार नजमुल हुसेन शांतो नाबाद ५१ आणि शाकिब अल हसन ५ धावांवर नाबाद आहेत. तर भारताकडून अश्विनने ३ आणि जसप्रीत बुमराहने १ विकेट घेतली आहे. अशारितीने भारत-बांगलादेश कसोटीचा तिसरा दिवसही भारताच्या नावे राहिला आहे.