भारत आणि बांगलादेश संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या कसोटी सामन्यांचा आज दुसरा दिवस आहे. भारतीय संघाला सात बाद वरुन कुलदीप यादव आणि आर आश्विनने भारतीय संघाला चांगल्या प्रकारे तारले आहे. या जोडीने भारतीय संघाला १२७ षटकांनंतर ३७५ धावापर्यंत पोहोचवले आहे. या दरम्यान आश्विनने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
आर आश्विनने १०३ चेंडूचा सामना करताना, दोन चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या आहेत. त्याबरोबर कुलदीप यादवने देखील त्याला सुरेख साथ दिली. त्याने १०० चेंडूत ३३ धावा केल्या आहेत. या जोडीने ८ विकेट्ससाठी ७९ धावांची भागीदारी केली. ही शानदार भागीदारी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांना विकेटसाठी झुंजवले आहे.
तत्पुर्वी श्रेयस अय्यरने बाद होण्यापूर्वी ८६ धावांची शानदार खेळी. त्याने आपल्या खेळीत १९२ चेंडूचा सामना करताना १० चौकार लगावले. त्याला इबादोत हुसेनने त्रिफळा उडवला. तो बाद झाल्यानंतर भारतीय संघाने १०४ षटकांत ७ बाद ३०१ धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि पुजाराने केलेल्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघ इथपर्यंत पोहोचू शकला. बांगलादेश संघाकडून तैजुल इस्लामने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या आहेत. मेहदी हसनने २ आणि खालीद अहमदने १ विकेट घेतली.
हेही वाचा – “तुझी बहीण म्हणून…” अर्जुनच्या शतकी खेळीनंतर सारा तेंडुलकरने दिला मोलाचा सल्ला
बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय सलामी फलंदाज शुबमन गिल (२०) आणि केएल राहुल (२२) बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारने शानदार खेळी साकारताना भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु अवघ्या १० धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने २०३ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. त्याचबरोबर ऋषभ पंतने ४६ धावांचे योगदान दिले.