भारत आणि बांगलादेश संघात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यातील आज दुसऱ्या दिवसाचा खेळ खेळला जात आहे. भारतीय संघाने आपल्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. तत्पुर्वी बांगलादेशचा पहिला डाव १५० धावांवर आटोपला. यामध्ये सर्वात जास्त योगदान कुलदीप यादवचे होते. त्याने पाच विकेट्स घेताना एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १३३.५ षटकांत सर्वबाद ४०४ धावा केल्या होत्या.ज्यामध्ये चेतेशवर पुजारा, श्रेयस अय्यर आणि आर आश्विन यांनी अर्धशतके झळकावली होती. त्याचबरोबर पंतने ४६ आणि कुलदीपने देखील ४० धावांचे योगदान दिले होते. त्याचबरोबर बांगलादेशचा पहिला डाव ५५.५ षटकांत सर्वबाद १५० धावांवर आटोपला. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाला २५४ धावांची आघाडी घेता आली.
चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा कुलदीप यादव हा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्याने १६ षटके गोलंदाजी करताना ४० धावा दिल्या आणि पाच विकेट्स घेतल्या. त्याने आपल्या या स्पेलमध्ये मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन, नुरुल हसन, तैजुल इस्लाम आणि इबादत हुसेन या तंबूत पाठवले. याचबरोबर तो भारतासाठी चट्टोग्रामच्या मैदानावर पाच विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
भारतीय संघाचा दुसरा डाव –
हेही वाचा – Video: अर्जुन तेंडुलकरसोबत योगराज सिंग यांनी धरला ठेका, व्हिडिओ होतोय व्हायरल
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावाच्या जोरावर २५४ धावांची आघाडी घेतली आहे. तसेच आपल्या दुसऱ्या डावाला देखील सुरुवात केली आहे. भारतीय संघाने २५.२ षटकांनंतर १ बाद ७७ धावा केल्या आहेत.शुबमन गिल ८४ चेंडूत ५० धावांवर नाबाद आहे. त्याचबरोबर चेतेश्वर पुजारा देखील एका धावेवर नाबाद आहे. परंतु कर्णधार केएल राहुल २३ धावांवर बाद झाला आहे. त्याला खालीद अहमदने बाद केले.