IND vs BAN Mohammed Siraj gets angry show finger to Najmul Hossain Shanto : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला. अशाप्रकारे भारतीय संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. चेन्नई कसोटीदरम्यान मैदानावर अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. कधी ऋषभ पंत बांगलादेशचे क्षेत्ररक्षण लावताना दिसला, तर कधी कोहली मैदानावर नागिन डान्स करताना दिसला, पण तेव्हा हद्द झाली, जेव्हा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोशी जुंपली. या दोघांत कशाामुळे वाद झाला? जाणून घेऊया.

सिराज आणि शांतो यांच्यात जुंपली –

चेन्नई कसोटीच्या चौथ्या दिवशी म्हणजे २२ सप्टेंबरला मोहम्मद सिराज भारतीय डावातील ४६ वे षटक टाकत असताना मैदानात गोंधळ झाला. गोलंदाजी करताना सिराज बांगलादेशचा कर्णधार शांतोशी भिडला. सिराजने ४६व्या षटकातील चौथा चेंडू शॉर्ट पिचा टाकला, जो बांगलादेशी कर्णधाराने सीमापार पाठवला. यानंतर सिराजने शांतोला काहीतरी म्हणाला आणि बोटही दाखवले. कदाचित सिराज त्याला जलद खेळायला सांगत असावा.

Tula Shikvin Changlach Dhada
Video: “सूनबाई जर…”, भुवनेश्वरीमुळे अधिपतीला भेटण्याची अक्षराची इच्छा अपूर्ण राहणार का? मालिकेत पुढे काय घडणार?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shocking video pune A Guy in Car attacked by 3 Youths on Scooter Pune street video goes viral
पुण्यात गुंडगीरी संपेना; कार चालकाचा पाठलाग केला शिवीगाळ केली अन्…VIDEO पाहून तुम्हीच सांगा या तरुणांचं करायचं काय?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये मारामारीच्या सीनचे ‘असे’ झाले शूटिंग; पाहा व्हिडीओ
Shiva
Video : “तू दे होकार, मला तेच…”, आशूची नाराजी दूर करण्याची शिवाची हटके स्टाईल; मालिकेत पुढे काय होणार?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
BPL 2025 Mahedi Hasan obstructing the field wicket
BPL 2025 : फिल्डरने सोडला कॅच… तरीही केलं अपील, अंपायरने फलंदाजाला दिलं आऊट, VIDEO होतोय व्हायरल
rasha thadani 12 th studies on set
Video : राशा थडानीने ‘आझाद’च्या सेटवर केला बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास; व्हायरल व्हिडीओत अभिनेत्री म्हणाली, “१० दिवसांत…”

मात्र, नजमुल हुसेन शांतोने संयम राखला आणि सिराजचे म्हणणे फारसे मनावर घेतले नाही. एका चेंडूनंतर सिराजने शांतोला पुन्हा स्लेजिंग करताना दिसला. सिराज आणि बांगलादेशच्या कर्णधाराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने दुसऱ्या डावात सर्वाधिक ८२ धावा केल्या. मात्र, तरी तो आपल्या संघाचा पराभव टाळू शकला नाही. कारण भारताने तब्बल बांगलादेशसमोर तब्बल ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ २३४ धावांवर गारद झाला. ज्यामुळे भारताने २८० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा – IND vs BAN : ‘शांतोने भारताबरोबर ‘तो’ माईंड गेम खेळायला नको होता’, बासित अलीने बांगलादेशच्या कर्णधारावर साधला निशाणा

भारतीय क्रिकेट संघाने रचला इतिहास

बांगलादेशला हरवून भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेट संघाने १९३२ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून भारताने एकूण ५८० सामने खेळले आहेत. ९२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच टीम इंडियाने पराभवापेक्षा जास्त विजयाचा आकडा गाठला आहे. बांगलादेशचा पराभव करून टीम इंडियाने कसोटी क्रिकेटमधील १७९वा विजय संपादन केला आहे. तर, संघाला १७८ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. आतापर्यंत भारतातील कसोटी क्रिकेटच्या ९२ वर्षांच्या इतिहासात असे घडले नव्हते. भारताने २२२ सामने अनिर्णित खेळले आहेत, तर भारताचा एक सामना रद्द झाला आहे.

Story img Loader