चट्टोग्राम कसोटीच्या चौथ्या दिवशी बांगलादेशच्या सलामीवीरांनी शानदार फलंदाजी करत उपाहारापर्यंत विकेट न गमावता ११९ धावा केल्या होत्या. कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात बांगलादेशच्या सलामीवीरांनी ११९ धावा केल्या होत्या तेव्हा १७ वर्षांनंतर हे घडले आहे. मात्र त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टीम इंडियाला परत आणत दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात आतापर्यंत ६ गडी बाद केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात बांगलादेशचा कर्णधार लिटन दाससोबत झालेल्या घटनेनंतर, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने बांगलादेशचा सलामीवीर नजमुल शांतोशी संवाद साधला असे म्हणण्यापेक्षा एकप्रकारे त्याने त्याला डिवचले. शानदार अर्धशतक झळकावल्यानंतर लगेच स्लेजिंगचा प्रयत्न केला पण त्याची प्रतिक्रिया लगेच उमटली पण ती अशी होती की त्यामुळे बांगलादेशच्या सलामीवीराने मन जिंकले.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात जोरदार शाब्दिक चकमक सिराजच्या बाजूने पाहायला मिळाली आहे. पहिल्या डावात लिटन दासला मोहम्मद सिराजने स्लेज केले. नंतर तो बाद झाल्यावर बाहेर पडला आणि विराट कोहलीनेही त्याची खिल्ली उडवली. बांगलादेशच्या दुसऱ्या डावातही सिराजने असेच काहीसे केले पण यावेळी त्याच्यासमोर नजमुल हसन शांतो होता. नजमुलने स्लेजिंग सहज सहन केले.
सामन्याच्या चौथ्या दिवशी, नजमुल हुसेन शांतोचे अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर, मोहम्मद सिराज त्याच्याकडे आला आणि काहीतरी म्हणाला पण फलंदाजाने प्रकरण जाऊ दिले. यानंतर सिराज पुन्हा आला आणि काही बोलला पण यावेळी फलंदाज शांतोने ते पाहून काहीच उत्तर दिले नाही. सिराज इथेच थांबला नाही आणि पुढच्या षटकात पुन्हा एकदा फलंदाजाच्या जवळ आला आणि स्लेजिंग केली. शांतो फक्त हसला आणि काहीच बोलला नाही. यानंतर शांतोने पुढचा चेंडू खेचत तो सीमारेषेपार चौकार स्वरुपात पाठवला. अशाप्रकारे सिराजला शांतोने त्याच्या बॅटने उत्तर दिले. सिराजचा स्लेजिंगचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होतो आहे.
या सामन्यात बांगलादेशच्या सलामीजोडीने इतिहास रचला. त्यांनी पहिल्यांदाच भारताविरुद्ध कसोटीत शतकीय भागीदारी केली. शांतो आणि झाकीर हसन यांनी पहिल्या विकेटसाठी २७७ चेंडूत १२४ धावांची भागीदारी केली. शांतो ६७ धावा करत बाद झाला, नंतरही हसन खेळपट्टीवर टीकून होता. त्याने शतकी खेळी केली. या दरम्यान त्याने लिटन दास याच्यासोबतही महत्वपूर्ण भागीदारी केली. हसन-दास जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी केली.