Yashasvi Jaiswal surpassed Ben Duckett in highest run scorer in the WTC 2025 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. चेन्नईमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आहेत, ज्यामध्ये बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. यासह, प्रतीक्षा सुरू झाली की भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जैस्वाल किती चेंडूंमध्ये इंग्लिश फलंदाजाला मागे टाकेल, यासाठी जयस्वालला जास्त वेळ लागला नाही आणि लवकरच तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या चक्रात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चक्रात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज इंग्लंडचा जो रूट आहे. दुसऱ्या स्थानावर भारताचा यशस्वी जैस्वाल पोहोचला आहे. हा सामना सुरु होण्यापूर्वी बेन डकेट आणि यशस्वी जैस्वाल यांच्या १०२८ अशा समान धावा होत्या. मात्र, आता यशस्वी एक धाव घेताच दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. जो रुट १३९८ धावा करून पहिल्या क्रमांकावर आहे. लवकरच जैस्वाल आणखी काही धावा करून जो रूटला मागे सोडेल, अशी अपेक्षा आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे चेन्नईतील पहिल्या कसोटीत सुरुवातीचे काही धक्के बसले असले तरी जैस्वाल डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

Hasan Mahmud Bangladesh Pacer Who Dismissed Rohit Sharma Virat Kohli and Shubman Gill
Hasan Mahmud: कोण आहे हसन महमूद? रोहित, विराट, शुबमनला बाद करत टीम इंडियाला टाकलं अडचणीत
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on T20I Cricket Retirement
IND vs BAN: रोहित शर्मा टी-२० मधून निवृत्तीचा निर्णय मागे घेणार? कर्णधाराने दिले उत्तर
AFG Vs SA Match Afghanistan Won
Afghanistan : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेला दणका; ६ विकेट्सनी विजय
Sunil Gavaskar slams Michael Vaughan for comment on Test cricket
Sunil Gavaskar Michael Vaughan : कसोटीत रुटने सचिनला मागे टाकले तर काय बदलेल? मायकेल वॉनच्या वक्तव्याला सुनील गावसकरांनी दिले चोख प्रत्युत्तर
Rishabh Pant 2nd Indian wicketkeeper to complete 4000 international cricket
IND vs BAN : ऋषभ पंतने ६३४ दिवसांनंतर पुनरागमन करताच केला मोठा पराक्रम, धोनीनंतर ‘हा’ विक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
Rishabh Pant Litton Das Heated Argument In IND vs BAN 1st Test
Rishabh Pant: “मला रोखून चेंडू का मारतो आहेस…”, ऋषभ पंत आणि लिट्टन दास मैदानातच भिडले, पाहा VIDEO

भारतीय संघाला तासाभरात बसले तीन मोठे धक्के –

भारतीय संघाला पहिला धक्का बसला, जेव्हा संघाची धावसंख्या केवळ १४ धावांवर होती. कर्णधार रोहित शर्मा केवळ ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शुबमन गिलला खातेही उघडता आले नाही. यानंतर विराट कोहली काहीतरी अप्रतिम करेल अशी अपेक्षा होती, पण तोही अपयशी ठरला. सहा चेंडूत सहा धावा करून तो बाद झाला. या तिघांना वेगवान गोलंदाज हसन महमूदने बाद केले. आता १८ षटकानंतर भारताची धावसंख्या ३ बाद ६७ धावा असून ऋषभ (२१) आणि यशस्वी (२८) खेळत आहेत.

हेही वाचा – CPL 2024 : शक्केरे पॅरिसने ठोकला १२४ मीटरचा गगनचुंबी षटकार, IPL मधील ॲल्बी मॉर्केलच्या विक्रमाची केली बरोबरी

भारताची प्लेइंग इलेव्हन: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.