बुधवारी ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश दुसरा वनडे सामना खेळला जाणार आहे. बांगलादेश संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय असणार आहे. कारण बांगलादेशचा संघ जिंकला, तर ते मालिका जिंकतील. तसेच भारतीय संघाला मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावा लागेल. दरम्यान दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल –

भारत आणि बांगलादेश संघातील दुसऱ्या वनडे सामन्याला सकाळी ११:३० वाजता सुरुवात होणार आहे. आजच्या सामन्यासाठी दोन्ही संघांत प्रत्येकी एक बदल करण्यात आला आहे. भारताने शाहबाज अहमदच्या जागी उमरान मलिकला संधी दिली आहे. त्याचबरोबर बांगलादेश संघाने हसन महमूदच्या जागी नसूमला संधी दिली आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करताना दिसणार आहे.

हेही वाचा – Video: मीराबाई चानूने ऑलिम्पिक विजेतीला दिली मात; वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये उचलले २०० किलो, पाहा

भारतीय संघ द्विपक्षीय मालिकेसाठी ७ वर्षानंतर प्रथमच बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला आहे. याआधी २०१५ मध्ये भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचा दौरा केला होता, तेव्हा त्यांना १-२ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पहिल्या वनडेतील पराभवानंतर त्या मालिकेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. निकाल त्यांच्या बाजूने न लागल्याने भारतीय संघ यंदा खूप दडपणाखाली आहे.

दोन्ही संघातील आकडेवारी –

टीम इंडियाला २०१५ मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेत १-२ असा पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा महेंद्रसिंग धोनी संघाचा कर्णधार होता. यावेळी रोहित शर्माला कोणत्याही परिस्थितीत मालिका गमवून चालणार नाही. भारताने बांगलादेशविरुद्ध ३७ पैकी ३० सामने जिंकले आहेत. बांगलादेशने आपल्या मायदेशात ऑक्टोबर २०१६ पासून एकही मालिका गमावलेली नाही. यादरम्यान त्यांनी झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि अफगाणिस्तानचा पराभव केला आहे.

हेही वाचा – IND vs BAN 2nd ODI: भारतासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान; शार्दुल ठाकुरच्या जागी उमरानला मिळणार संधी?

दोन्ही संघांची आजच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन –

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, उमरान मलिक</p>

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): नजमुल हुसेन शांतो, लिटन दास (कर्णधार), अनामूल हक, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्ला, अफिफ हुसेन, मेहदी हसन मिराज, नसुम अहमद, इबादत हुसेन, मुस्तफिजुर रहमान

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 2nd odi bangladesh won the toss and elected to bat first see the playing xi of both teams vbm