बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. ०४ डिसेंबर) पार पडला. हा सामना बांगलादेशने आपल्या नावावर केला आहे. आता या मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (दि. ०७ डिसेंबर) ढाका येथे खेळला जात आहे. तत्पूर्वी ११ वाजता नाणेफेक पार पडली. यावेळी बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारतीय महिला संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्राने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे.
दुसरा एकदिवसीय सामना मालिकेच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियातील दुसरा बदल म्हणजे संघातून वेगवान गोलंदाज कुलदीप सेनला डच्चू देण्यात आला असून त्याच्या जागी उमरान मलिकचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. कुलदीप सेनला वगळण्याचे कारण कर्णधार रोहित शर्माने टॉसनंतर सांगितले की तो या सामन्यासाठी उपलब्ध नाही. पण मीरपूरच्या मैदानावर उपस्थित भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार अंजुम चोप्रा हिला हे कारण पटलेले नाही.
हेही वाचा: IND vs BAN 2nd ODI: भारतीय संघाला मोठा धक्का; दुखापत झाल्याने रोहित शर्मा रुग्णालयात दाखल
ही काय संगीतखुर्ची आहे का?
नाणेफेकीनंतर अंजुम चोप्रा सोनी ब्रॉडकास्ट चॅनलवर आली आणि तिने याकडे लक्ष वेधले. त्यावेळी अजय जडेजा आणि अजित आगरकर देखील त्यावेळी तिथे चर्चेत सहभागी होता. ती म्हणाली की “ती दावा करू शकत नाही पण तिने पाहिलेल्या दृष्यानुसार कुलदीप सेनचा दुखापत किंवा फिटनेसशी काही संबंध आहे असे तिला वाटत नाही. क्रिकेट सामन्याच्या प्री-शोमध्ये अजय जाडेजाच्या प्रश्नांना उत्तर देताना तिने कुलदीप सेनला रनअप घेताना आणि सराव करताना पाहिल्याचे सांगितले. आणि ती छायाचित्रे पाहिल्यानंतर कुलदीप सेनचा फिटनेसशी संबंध आहे असे तिला वाटत नसल्याचेही स्पष्ट केले. तसेच, टीम इंडियामध्ये संगीत खुर्ची सुरू आहे. असाच प्रकार सुरू राहिला तर कोणताच खेळाडू आपली सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही, असे तिने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाला सुनावलं.”
हेही वाचा: एक ‘झॉम्बी’ तर एक ‘लॉबीस्ट’ वसीम अक्रमने केले आत्मचरित्रात आश्चर्यकारक खुलासे
त्यातच कर्णधार रोहित शर्माच्या दुखापतीची टीम इंडियाच्या संकटात भर पडली. रोहितच्या हातून झेल सुटल्यानंतर फलंदाजाचा आनंद फार काळ टीकू शकला नाही. सिराजच्या त्याच षटकातील पाचव्या चेंडूवर अनामुल हक पायचित झाला. रोहित दुखापतग्रस्त झाल्याने संघाचे नेतृत्व केएल राहुल याच्यावर सोपवण्यात आले. या सामन्यात भारतीय संघात दोन बदल करण्यात आले. संघात उमरान मलिक आणि अक्सर पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. सिराजच्या षटकाचा चौथा चेंडू अनामुल हक याच्या बॅटला लागून स्लीपमध्ये उभ्या असणाऱ्या रोहित शर्माच्या हातात गेला आणि रोहितच्या हातून हा झेल सुटला. मात्र, नंतर लक्षात आले की रोहितच्या हाताला यामुळे गंभीर इजा होऊन त्याचा हातही रक्तबंबाळ झाला.