विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या रोहित शर्माने अनोखा विक्रम केला आहे. भारताकडून १०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध बडोद्याच्या मैदानातला दुसरा टी-२० सामना रोहितच्या टी-२० कारकिर्दीतला शंभरावा सामना ठरला आहे. रोहितने पाकिस्तानचा माजी आक्रमक फलंदाज शाहिद आफ्रिदीचा ९९ सामन्यांचा विक्रम मोडला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणाऱ्यांच्या यादीत रोहितचा अपवाद वगळता धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. धोनीने आतापर्यंत ९८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत. या यादीमध्ये पाकिस्तानचा शोएब मलिक रोहितच्या पुढे आहे, त्याने आतापर्यंत १११ टी-२० सामने खेळले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा