कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेताना झळकावलेल्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दिलेलं १५४ धावांचं आव्हान भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार केलं. रोहितने ४३ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ८५ धावा केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अवश्य वाचा – IND vs BAN : माझी स्पर्धा माझ्याशीच ! रोहित शर्मा ठरतोय षटकारांचा बादशहा

या अर्धशतकी खेळीसह रोहितने सचिन तेंडुलकरच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे भारतीय फलंदाज –

  • कसोटी क्रिकेट – सचिन तेंडुलकर (७९ वेळा)
  • वन-डे क्रिकेट – सचिन तेंडुलकर (८९ वेळा)
  • टी-२० क्रिकेट – रोहित शर्मा (१० वेळा)

रोहित शर्माला शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : टी-२० क्रिकेटमध्ये गब्बर-हिटमॅन ची जोडी ठरतेय सुपरहिट