राजकोटच्या मैदानात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताना ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बांगलादेशने भारताला विजयासाठी १५४ धावांचं आव्हान दिलं होतं. प्रत्युत्तरादाखल रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
गेल्या काही वर्षांत रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचा पाऊस पाडतो आहे. २०१७ सालपासून रोहित शर्माची आकडेवारी पाहिली की त्याच्या खेळातल्या आक्रमकतेचं सर्वांना परिचय येईल.
Most SIXES in International matches in a calendar year:
74 – Rohit Sharma, 2018
66* – Rohit Sharma, 2019
65 – Rohit Sharma, 2017
63 – AB de Villiers, 2015Rohit Sharma is easily the six-hitting-machine of this generation! #IndvBan
— Bharath Seervi (@SeerviBharath) November 7, 2019
दरम्यान रोहित शर्माला शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
अवश्य वाचा – शतकी टी-२० सामना खेळणारा रोहित पहिला भारतीय, जाणून घ्या पहिल्यांदा शंभरावी कसोटी आणि वन-डे खेळणारे भारतीय