भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (२२ डिसेंबर) खेळवला जात आहे. टीम इंडियाने चितगावमधील पहिला कसोटी सामना जिंकला आणि मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. आता भारताची नजर निर्भेळ यशाकडे असेल. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) च्या लढाईत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारतीय संघाला दुसरा कसोटी सामना जिंकून आपले स्थान मजबूत करायचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत केएल राहुल याच्याच नेतृत्वाखाली या सामन्यात खेळणार आहे. तसेच बांगलादेशच्या संघात दोन तर भारताच्या संघात एक बदल झाला आहे. भारताच्या अंतिम अकरामधून कुलदीप यादव याला वगळले असून त्याच्याजागी संघात जयदेव उनाडकट आला आहे. कुलदीपने मागील सामन्यात विजयी भुमिका पार पाडली होती. बांगलादेशमध्ये मोमिनुल हक आणि तस्किन अहमद यांना अंतिम अकरामध्ये जागा दिली आहे. यामुळे यासीर अली आणि इबादत हुसेन बाकावर बसले आहेत.

बांगलादेशच्या डावाची सुरूवात झाली आहे. झाकीर हसन आणि नझमुल हसन शांतो ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. शांतोला या सामन्यात मोठ्या इनिंग खेळणार का याकडे सर्व बांगलादेशच्या नजरा लागल्या आहेत. झाकीरने पहिली कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. या सामन्यातही तो आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवू इच्छितो.

IND vs BAN: उद्यापासून भारत विरुद्ध बांग्लादेश दुसरी कसोटी, भारताचा ‘हा’ खेळाडू ‘सर डॉन ब्रॅडमनचा’ मोडणार विक्रम

सामना सुरु होताच भारताला विकेट घेऊन बांगलादेशला अडचणीत आणण्याची मोठी संधी मिळाली होती. मोहम्मद सिराजने सामन्याच्या दुसऱ्याच षटकात झाकीर हसनला स्वतःच्या गोलंदाजीवर झेल सोडला. त्यामुळे गेल्या सामन्यात शतक झळकावणाऱ्या झाकीरला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. सिराजने स्क्वेअर लेगवर त्याचा सोपा झेल सोडला आणि तिथेच त्याला दुखापत झाली. मात्र, ती दुखापत फारशी गंभीर झाली नसून तो गोलंदाजी करण्यास सक्षम आहे.  सध्या बांगलादेशने १५.४ षटकात ३९/२ धावा केल्या आहेत. दोन्ही सलामीवीरांना तंबूत पोहचवण्यात यश आले आहे. फिरकीपटू आर. अश्विनने त्यांना माघारी पाठवले. नजमुल शांतोने ५७ चेंडूत २४ तर झाकीर हसनने १५ धावा केल्या.

भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धची सलग तिसरी आणि सातवी कसोटी मालिका जिंकायची आहे. दोन्ही देशांमधील हा १३वा कसोटी सामना असेल. भारताने १० सामने जिंकले असून दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. ढाका येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या कसोटीत भारतीय संघाचा १०० टक्के विजयाचा विक्रम आहे. याआधी झालेल्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताने बांगलादेशचा पराभव केला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 2nd test bangladesh won the toss this player got a chance to replace kuldeep yadav in the indian team avw