मीरपूर येथे रंगलेल्या भारत-बांगलादेश यांच्यातील रोमांचक दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यर आणि आर. अश्विनने झुंजार फलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तीन गडी राखून पराभव केला. त्यांनी सामन्याच्या चौथ्या दिवशी (रविवार) ७ गडी गमावून १४५ धावांचे लक्ष्य गाठले. यासह भारताने बांगलादेशचा दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले.

भारताच्या दुसऱ्या डावात झटपट विकेट्स पडत असताना आर अश्विन, श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी उल्लेखीय फलंदाजी केली.  खासकरून श्रेयस अय्यर आणि आर. अश्विन या दोघांनी नाबाद ७१ धावांची विजयी भागीदारी केली. आठव्या गड्यासाठी यांच्यात झालेल्या भागीदारीने अनेक विक्रम मोडले. त्यात त्यांनी एल अमरसिंग – लाल सिंग यांच्या ७४ धावांच्या इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर १९३२ (पहिली कसोटी) साली केलेल्या भागीदारीला मागे टाकले. त्यानंतर  श्रीलंकेविरुद्ध १९८५ साली भारताचे विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अष्टपैलू खेळाडू कपिल देव आणि एल शिवरामकृष्णन यांच्या ७० धावांचा विक्रम देखील मोडला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
India Beat Ireland by 305 Runs and Registers Biggest Margin Victory in Womens ODI Cricket INDW vs IREW
INDW vs IREW: ऐतिहासिक! भारताच्या महिला संघाने नोंदवला इतिहासातील सर्वात मोठा विजय, आयर्लंडचा उडवला धुव्वा
IND vs IRE Smriti Mandhana and Pratika Rawal 233 run partnership broke a 20 year old record against Ireland
IND vs IRE : स्मृती-प्रतिकाच्या द्विशतकी भागीदारीने केला मोठा पराक्रम! मोडला २० वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम
Pratika Rawal Maiden ODI Century in INDW vs IREW New India Opener After Continues Fifties
INDW vs IREW: टीम इंडियाची युवा सलामीवीर प्रतिका रावलचं पहिलं वनडे शतक, भारतीय अंपायरच्या लेकीची धमाकेदार खेळी
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर अश्विनने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “आमच्याकडे फारशी फलंदाजी शिल्लक नव्हती. हा असा सामना होता जिथे एक चूक आणि सामना हातातून निसटू शकत होता. श्रेयसने शानदार फलंदाजी केली. काहीवेळा या परिस्थितींमध्ये असे वाटते की अनेक गोष्टी डोक्यात ठेऊन पुढे जावे लागेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि मला वाटते की आम्हाला आमच्या बचावावर आणखी काम करणे गरजेचे आहे. श्रेयसची फलंदाजी आवडली. इथल्या खेळपट्ट्या खूप चांगल्या आहेत. पण मला वाटलं की बॉल खूप लवकर सॉफ्ट झाला. बांगलादेशला खरोखर श्रेय दिले पाहिजे, त्यांनी काही क्षणी आमच्यावर थोडा जास्तच दबाव आणला.” अश्विन पुढे म्हणतो, “जर श्रेयस अय्यर प्लेअर ऑफ द सीरीज नसता, तर मी माझा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार त्याच्यासोबत शेअर केला असता, त्याने अप्रतिम फलंदाजी केली.”

बांगलादेशला चारीमुंड्या चित केल्यानंतर श्रेयस अय्यरने ही आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला की, “ ज्यावेळी भारताच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडत होत्या त्यावेळी मी फक्त एका ४० ते ५० धावांच्या भागीदारीचा विचार करत होतो. अक्षर बाद झाल्यानंतर मी अश्विनला मदतीला घेतले. मी त्याला म्हणालो आपण षटकात एक मोठा मारायचा आणि मग स्ट्राईक रोटेट करायची. जेणेकरून त्यांचे गोलंदाज सेट होणार नाहीत आणि क्षेत्ररक्षक आपल्यापासून लांब जातील. ठरवलेल्या प्लानप्रमाणे आम्ही खेळत गेलो आणि जेव्हा ५० पेक्षा कमी धावा विजयासाठी हव्या होत्या तेव्हा मात्र आम्ही अधिक आक्रमक होऊन फटके खेळण्यास सुरुवात केली.”

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: नाताळानिमित्त टीम इंडियाकडून चाहत्यांना मालिका विजयाचं गिफ्ट! मीरपूर कसोटी जिंकली; मालिका २-० ने खिशात

२०२२ या वर्षात श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली

२०२२ या वर्षात श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारात मिळून त्याने ३९ डावात ४७.८७ च्या सरासरीने १५८० धावा केल्या. त्यात एका शतकाचा समावेश आहे. बाबर आझम, लिटन दास, मोहम्मद रिझवान हे तीन फलंदाज त्याच्या पुढे आहेत तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथला त्याने मागे टाकले आहे.

हेही वाचा: IND vs BAN 2nd Test: सिराजचा बुलेटच्या वेगाने गेलेला चेंडू… अन् क्लीन बोल्ड; लिटन दास स्तब्ध, Video व्हायरल

अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर

अष्टपैलू खेळाडूंच्या बाबतीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने आत्तापर्यंत ३००० धावा आणि ४४७ बळी घेतले आहेत. तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून शॅान पोलाक, कपिल देव, स्टुअर्ड ब्रॉड आणि शेन वॉर्न यांना त्याने मागे टाकले आहेत, तर रिचर्ड हेडली त्याच्या पुढे आहे.

Story img Loader