India vs Bangladesh 2nd Test Updates: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर रोजी कानपूर येथे खेळवला जाईल. भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना जिंकला असून १-० ने आघाडीवर आहे. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना २८० धावांनी जिंकला होता. भारतीय संघ आता दुसरा कसोटी सामना जिंकून मालिका क्लीन स्वीप करण्याच्या निर्धारासह उतरणार आहे. अश्विनने पहिल्या कसोटीत चमकदार कामगिरी केली होती आणि सामनावीराचा किताब पटकावण्यात तो यशस्वी ठरला होता.

भारत वि बांगलादेश हेड टू हेड (IND vs BAN Head to head in Test)

IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Idol exam today but some students don't have admit cards for exam Mumbai
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Who is the Indian Shubham Ranjan who will play in BPL 2025 in Bangladesh
BPL 2025 : मराठमोळा शुभम रांजणे बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये

भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने झाले असून त्यात भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहेत. बांगलादेश संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. दोन्ही संघांमधील दोन सामने अनिर्णित राहिले.

हेही वाचा – Shakib Al Hasan: शकिब अल हसनने कसोटी आणि टी-२० क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती, म्हणाला, “…नाही तर भारताविरूद्धची टेस्ट अखेरचा सामना”

कानपूर खेळपट्टीचा अहवाल (Kanpur Pitch report)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटीत कानपूरच्या ग्रीन पार्कमधील खेळपट्टी वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंसाठी संतुलन राखणारी असेल अशी अपेक्षा आहे. सामन्याच्या सुरूवातीला ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना आणि सामना जसा पुढे सरकत जाईल तशी फिरकीपटूंना मदत करेल. पृष्ठभाग हा पहिल्या दोन सत्रात वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी आणि हालचालीसह मदत करेल. तर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळपट्टीवर फिरकीपटू सामन्यात पुनरागमन करतील अशी अपेक्षा आहे. ग्रीन पार्कची खेळपट्टी, उन्नाव जवळील काली मिट्टी गावातील काळ्या मातीपासून बनवलेली आहे, जी विशेषत: कसोटी सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात फिरकीपटूंसाठी अनुकूल म्हणून ओळखली जाते.

हेही वाचा –VIDEO: युवराज सिंगला गर्लफ्रेंड अभिनेत्रीच्या गुलाबी ‘स्लिप-ऑन्स’ घालून जावं लागलं एअरपोर्टवर, ‘तिचं’ नाव सांगण्यास दिला नकार

हवामानाचा अंदाज (IND and BAN: WEATHER REPORT)

कानपूरमधील दुस-या कसोटीच्या पहिल्या तीन दिवसात हवामान खराब असून पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. कसोटीच्या पहिल्या दिवशी म्हणजे २७ सप्टेंबरला ९३ टक्के पावसाची शक्यता आहे. दिवसभर पाऊस अपेक्षित आहे, जो संध्याकाळपर्यंत आणखी तीव्र होईल. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी 2२८ तारखेला ८० टक्के पावसाची शक्यता दर्शविण्यात आली. दरम्यान, तिसऱ्या दिवशी ५९ टक्के पावसाची शक्यता आहे. अखेरच्या दोन्ही दिवशी हवामान स्वच्छ असेल तर पावसाची शक्यता फारच कमी आहे.

हेही वाचा – IPL Player Auctions: BCCI आयपीएल लिलावासाठी बदलणार मोठा नियम, मुंबई इंडियन्सला होणार तगडा फायदा

Where to Watch India vs Bangladesh 2nd Test: भारत वि बांगलादेश लाईव्ह स्ट्रीमिंग

भारत वि बांगलादेश मालिकेतील दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स १८ या चॅनेलवर होणार आहे. तर जिओ सिनेमा या मोबाईल अॅपवर आणि वेबसाईटवर या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट होणार आहे.

भारत वि बांगलादेश संघ

भारत:
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मो.सिराज, आकाश दीप, यश दयाल.

बांगलादेश:
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), शकीब अल हसन, महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मेहदी हसन मिराझ, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), लिटन कुमार दास (यष्टीरक्षक), तैजुल इस्लाम, नईम हसन , हसन महमूद , तस्किन अहमद , नाहिद राणा, सय्यद खालेद अहमद, जाकेर अली अनिक.

Story img Loader