कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असा विजय मिळवत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतलं आपलं अव्वल स्थान अधिक भक्कम केलं. आहे. भारताने बांगलादेशवर १ डाव आणि ४६ धावांनी मात केली. पहिला डाव ३४७ धावांवर घोषित केल्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव भारताने १९५ धावांवर संपवला. या विजयासह भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग चार सामने डावाने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे.
दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. उमेश यादवने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला तर त्याला इशांत शर्माने ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशचा एक फलंदाज जखमी झाल्यामुळे खेळू शकला नाही.
दुसऱ्या दिवसाच्याी अखेरीस भारताने बांगलादेशच्या सहा फलंदाजांना माघारी धाडलं होतं. मात्र मुश्फिकुर रहिमने मैदानात थोडावेळ तग धरत झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज झटपट माघारी परतले आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
उमेश यादवने घेतला बळी, भारत सामन्यात १ डाव आणि ४६ धावांनी विजयी
मालिकेतही २-० ने मारली बाजी
भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करणारा मुश्फिकुर माघारी, आठवा गडी माघारी
मुश्फिकुरची ७४ धावांची खेळी, बांगलादेश अजुनही पिछाडीवरच
इबादत हुसेन माघारी, उमेश यादवने घेतला बळी