भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघाच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावलं आहे. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांवर आटोपल्यानंतर भारताने पहिल्या डावात पुजारा-रहाणेचं अर्धशतक आणि विराटच्या शतकाच्या जोरावर कसोटी सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे आपलं अर्धशतक झळकावल्यानंतर माघारी परतले, मात्र विराटने खेळपट्टीवर स्थिर राहत आपलं शतक झळकावलं. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचं हे ४१ वं शतक ठरलं. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटींगशी बरोबरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने सर्वाधिक शतकं झळकावणारे फलंदाज –

  • रिकी पाँटींग/विराट कोहली – ४१ शतकं*
  • ग्रॅम स्मिथ – ३३ शतकं
  • स्टिव्ह स्मिथ – २० शतकं

दरम्यान पहिल्या दिवशी चेतेश्वर पुजाराने अर्धशतक झळकावल्यानंतर, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेनेही अर्धशतकी खेळी करत विराटला साथ दिली. अजिंक्यने ६९ चेंडूत अजिंक्यची ७ चौकारांसह ५१ धावांची खेळी केली.

Story img Loader