IND vs BAN 2nd Test Yashasvi Jaiswal broke Virender Sehwag record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कर्णधार रोहितसह भारतीय डावाला आक्रमक सुरुवात करुन दिली. यशस्वी जैस्वालने ५१ चेंडूंचा सामना करताना ७२ धावांची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर यशस्वी जैस्वालने भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मोठा विक्रम मोडला.

यशस्वीने अवघ्या ३१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. या वादळी अर्धशतकाच्या जोरावर त्याने माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा विक्रम मोडला आहे. खरे तर, यशस्वीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी संयुक्त दुसरे जलद अर्धशतक ठोकले आहे. त्याच्याशिवाय अष्टपैलू शार्दुल ठाकूरने ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. शार्दुलने २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. त्याचवेळी, सेहवागने २००८ मध्ये इंग्लंडविरुद्ध ३२ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम ऋषभ पंतच्या नावावर आहे.

भारतासाठी कसोटीत सर्वात जलद अर्धशतक झळकावणारे फलंदाज –

२८ ऋषभ पंत विरुद्ध श्रीलंका, बंगळुरू २०२२
३० कपिल देव विरुद्ध पाकिस्तान, कराची १९८२
३१ शार्दुल ठाकूर विरुद्ध इंग्लंड, ओव्हल २०२१
३१ यशस्वी जैस्वाल विरुद्ध बांगलादेश, कानपूर २०२४
३२ वीरेंद्र सेहवाग विरुद्ध इंग्लंड, चेन्नई २००८

हेही वाचा – IND vs BAN : भारताने इंग्लंडचा रेकॉर्ड मोडत केला विश्वविक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला खास पराक्रम

भारताने पहिल्या डावात चमकदार सुरुवात केली. यशस्वीने कर्णधार रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ५५ धावा जोडल्या. भारताने तीन षटकांत ५० धावा पूर्ण केल्या, हा एक विक्रम आहे. चौथ्या षटकात रोहित मेहदी हसन मिराजचा बळी ठरला. त्याने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २३ धावा केल्या. त्याचवेळी भारताने १०.१ षटकात १०० धावा पूर्ण करत नवा विक्रम केला. यशस्वीला १५व्या षटकात हसन महमूदने क्लीन बोल्ड केले.

हेही वाचा – IND vs BAN : कानपूरमध्ये मेहदी हसन मिराजवर गांधीलमाशीचा हल्ला, पॅड असूनही गुडघ्याला चावली

कानपूर कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला. जसप्रीत बुमराहने तीन, मोहम्मद सिराज, आकाश दीपने प्रत्येकी दोन तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. उपाहारानंतर ६ बाद २०५ धावांवर खेळत असलेल्या बांगलादेशने २८ धावांत चार विकेट्स गमावल्या. मोमिनुल हकने १९४ चेंडूत नाबाद १०७ धावा केल्या. त्याने १७ चौकार आणि एक षटकार मारला.