भारतीय कसोटी संघातला सलामीवीर मयांक अग्रवालने आपलं संघातलं स्थान पक्क केलं आहे. बांगलादेशविरुद्ध इंदूर कसोटी सामन्यात मयांकने आपल्या शतकी खेळीचं द्विशतकात रुपांतर केलं आहे. बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत मयांकने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत धावा काढल्या. मेहदी हसनच्या गोलंदताजीवर १९६ धावांवर खेळत असताना मयांकने खणखणीत षटकार खेचत आपलं द्विशतक साजरं केलं.

कसोटी क्रिकेटमध्ये षटकाराच्या जोरावर द्विशतक पूर्ण करणारा मयांक दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटी सामन्यात अशी कामगिरी केली होती. यानंतर मयांक अग्रवालने बांगलादेश कसोटी सामन्यात या कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे.

अजिंक्य रहाणेने मयांक अग्रवालला चांगली साथ दिली. दुसऱ्या दिवशी सुरुवातीच्या सत्रात पुजारा आणि कोहली झटपट माघारी परतल्यानंतर अजिंक्यने मयांकच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. अजिंक्यचं शतक मात्र थोडक्यात हुकलं.

अवश्य वाचा – IND vs BAN : कर्णधार विराटच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

Story img Loader