भारत आणि बांगलादेश संघात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने पहिल्या डावात २२७ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारतीय संघाने आपल्या पहिल्या ३१४ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा बांगलादेशने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. बांगलादेश अजूनही ८० धावांनी पिछाडीवर आहे. तत्पुर्वी ऋषभ पंतने आपले शतक हुकल्यानंतर, एमएस धोनीच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज म्हणून, सर्वाधिक ९०पेक्षा अधिक धावा करण्याचा विश्वविक्रम आहे. भारताकडून महेंद्रसिंग धोनी या बाबतीत नंबर-१ होता. पण आता ऋषभ पंतने त्याची बरोबरी केली आहे. बांगलादेशविरुद्ध ९३ धावांवर बाद झाला. पंत ११व्यांदा ९०पेक्षा अधिक धावांवर बाद झाला आहे. अॅडम गिलख्रिस्टने २० वेळा अशी कामगिरी केली आहे. तसेच झिम्बाब्वेचा अँडी फ्लॉवर १२ वेळा अशी कामगिरी करून दुसऱ्या स्थानावर आहे. पंत आणि धोनी दोघांनीही ११-११वेळा अशी कामगिरी केली आहे.
हेही वाचा – IPL Auction 2023: केन विल्यमसनला तब्बल इतक्या कोटींचा बसला फटका, आता ‘या’ जर्सीत दिसणार
धोनीने सहावेळा शतक केले आहे, तर पंतने पाच वेळा शतक केले आहे. दुसरीकडे, जर आपण गिलख्रिस्टबद्दल बोललो, तर त्याने २० वेळा ९०पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने १७ वेळा शतक पूर्ण आहे, तर अँडी फ्लॉवर कसोटी क्रिकेटमध्ये कधीही नर्वस ९० चा बळी ठरला नाही. त्याने ९०पेक्षा अधिक धावा १२ वेळा केल्या आणि प्रत्येक वेळी शतक झळकवले आहे.