उमेश यादवने मिरपूर कसोटीत बांगलादेशविरुद्ध चार बळी घेतले. भारतीय संघाचा हा वेगवान गोलंदाज टीम इंडियात नियमित खेळत नाही. मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहला संधी मिळाली, ज्याचा उमेश यादवने पुरेपूर फायदा उठवला. चार विकेट्सच्या जोरावर उमेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक मोठा विक्रमही केला आहे.
इम्रान खानला टाकले मागे –
वेगवान गोलंदाज म्हणून उमेश यादवने आशियाई खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याच्या बाबतीत, पाकिस्तानच्या विश्वचषक विजेत्या कर्णधाराला मागे टाकले आहे. १०० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणाऱ्या क्रिकेटर्सबद्दल बोलायचे झाले, तर उमेशने पाकिस्तानचा माजी कर्णधार इम्रान खानचाही विक्रम मागे टाकला आहे.
इम्रानसोबतच शेजारील देशाचा अनुभवी गोलंदाज वसीम अक्रमही स्ट्राइकरेटच्या बाबतीत मागे राहिला आहे. उमेश यादवचा टेस्ट स्ट्राइक रेट ४८.५ आहे तर इम्रान ४८.८ आणि वसीम ५२.४सह तिसऱ्या स्थानावर आहे.
कोण आहे आशियाचा किंग –
आशियातील सर्वोत्तम स्ट्राईक रेट असलेल्या वेगवान गोलंदाजाबद्दल बोलायचे झाल्यास, पाकिस्तानच्या वकार युनूसचे नाव प्रथम येते. तो ३८.२ च्या स्ट्राइक रेटसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर शोएब अख्तर ४४.५ च्या स्ट्राइक रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत उमेश यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने ८२ षटकांत ८ विकेट्स गमावून २९६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय संघ अजूनही ६९ धावांनी पिछाडूवर आहे. सध्या जयदेव उनाडकट आणि उमेश यादव १३ आणि ५ धावांवर खेळत आहेत. तसेच भारताकडून सर्वाधिक धावा ऋषभ पंतने केल्या. त्याने ९३ धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर ७ धावांनी त्याचे शतक हुकले. बांगलादेश संघाकडून गोलंदाजी करताना, तैजुल इस्लाम आणि शाकिब अल हसनने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या.