चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः धावांचा पाऊस‌ पाडला. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे.

सोनी स्पोर्ट्सवर मुलाखत देताना भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशन याने सामन्यादरम्यान झालेले अनेक किस्से उघड केले. आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण असणारा किशनने द्विशतक साजरे करतानाचे घटना शेअर केली आहे. विराट कोहलीने इशानचे द्विशतक साजरे करताना “ए भाई लग जाएगा जरा संभाल के” अस म्हणत दोघांमध्ये एकच हशा पिकला.

sreeleela doing item song in pushpa 2 movie
श्रद्धा कपूरने नाकारली ‘पुष्पा २’ ची ऑफर, आता ‘ही’ अभिनेत्री करणार अल्लू अर्जुनबरोबर आयटम साँग; घेतलं ‘इतकं’ मानधन
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Jitendra Joshi
जितेंद्र जोशीने चोरलेला ‘या’ दिग्गज बॉलीवूड अभिनेत्याचा फोटो; म्हणाला, “त्यानंतर जो मार खाल्ला…”
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
Kolkata’s chess star Anish Sarkar impresses Anand Mahindra
कोण आहे अनिश सरकार? तीन वर्षाच्या चिमुकल्याने जिंकले आनंद महिंद्रा यांचे मन, Video शेअर करत केले त्याचे तोंडभरून कौतुक
raosaheb danve compared himself as shivaji maharaj
“मी शिवाजी तर, अब्दुल सत्तार औरंगजेब”; रावसाहेब दानवेंचं विधान!
Rishabh Pant Shubman Gill Hits Fiery Fifty against New Zealand as India Got Good Start IND vs NZ 3rd Test Day 2
IND vs NZ: भारतीय संघाची टी-२० स्टाईल सुरूवात, पंत-गिलची झंझावाती अर्धशतकं; किवी गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Neelam Kothari
“ती खूप घाबरली…”, समीर सोनीने सांगितला पत्नी नीलम कोठारीचा किस्सा; म्हणाला, “तुम्ही विशीत असताना…”

हेही वाचा: IND vs BAN 3rd ODI: इशान किशनने बांगला टायगर्सची केली शिकार! भारताचा बांगलादेशवर २२७ धावांनी विजय, मात्र मालिका २-१ ने गमावली

मुलाखती दरम्यान यावरच त्याने भाष्य केले आहे. तो म्हणाला, “ १९७ धावसंख्येवर असताना मला षटकार मारून द्विशतक पूर्ण करायचे होते. पण पहिलेच द्विशतक असल्याने रिस्क घेऊ नको असे विराट सुचवत होता. पुढे त्याला बोलताना सांगितले की, शेवटच्या चेंडूपर्यंत मला याची आठवण करून देत राहा. मुस्तफिजूर एकतरी स्लोअर चेंडू टाकणारच आणि मी त्याला नक्की षटकार मारणार अशी काहीशी माझी अवस्था झाली होती. अखेर संयम बाळगत मी द्विशतक पूर्ण केले आणि ते साजरे करताना प्रचंड उत्साह माझ्यात संचारला होता. त्याच नादात मागे कोण आहे हे लक्षात आले नाही. त्यामुळे नेमकी माही बॅट विराटला लागली असती. त्यावर तो म्हणाला “ए भाई लग जाएगा जरा संभाल के”!

बांगलादेशविरूद्ध २१० धावांची धडाकेबाज खेळी केल्यानंतर सोनी स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाला की, “सचिन तेंडुलक, रोहित शर्मा, विरेंद्र सेहवाग आणि इतर सर्व वनडेत द्विशतक ठोकणाऱ्या दिग्गजांसोबत माझे नाव जोडले गेल्याने मला खूप स्वतः विषयी अभिमान वाटत आहे.” दरम्यान, समालोचकाने त्याला विराट आणि त्याच्या भागीदारीविषयी विचारले. त्यावेळी इशान किशन म्हणाला की, “विराट कोहलीबरोबर खेळणं जबरदस्त असतं. त्यानेच मला वेळोवेळी शांत केलं. मी त्याला माझे शतक पूर्ण करण्यासाठी षटकार मारणार असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने मला तसं न करण्याचा सल्ला दिला. तो म्हणाला की हे तुझे पहिले शतक आहे. सावधपणे खेळ.”

हेही वाचा: IND vs BAN 3rd ODI: जय-वीरूची जोडी! इशान किशन आणि विराट कोहलीने रचला नवा इतिहास

ईशानने ८५ चेंडूवर आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. मात्र, यानंतरही तो अजिबात थांबला नाही. त्याने आणखी आक्रमक पवित्रा घेत आपल्या शतकाला द्विशतकामध्ये परिवर्तित केले. ईशानने बाद होण्यापूर्वी १३१ चेंडूचा सामना करताना २१० धावा केल्या. यामध्ये २४ चौकार व १० षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने विराटने संयम व आक्रमण यांचा सुरेख मेळ साधत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७२ वे शतक पूर्ण केले. त्याने बाद होण्यापूर्वी ९१ चेंडूवर ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या.