शनिवारी (दि. १० डिसेंबर) बांगलादेश विरुद्ध भारत संघात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभव पत्करणाऱ्या भारतासाठी हा ‘करो वा मरो’ सामना आहे. झहुर अहमद चौधरी स्टेडिअम, चट्टोग्राममधील या सामन्यात मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ओळख असणाऱ्या भारताच्या सलामीवीराने खास विक्रम आपल्या नावावर केला. विशेष म्हणजे, कमी वयात अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा क्रमांकाचा खेळाडू बनला. या यादीत सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा आणि यांचाही समावेश आहे.
इशान किशनने शानदार फटकेबाजी करत कारकीर्दतील पहिले द्विशतक झळकावले. सगळ्यात कमी चेंडूत द्विशतक करत त्याने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढला. ख्रिस गेलने १३८ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले होते व तो १४७ चेंडूत २१५ धावा करून बाद झाला होता. मात्र इशान किशनने केवळ १२६ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आणि १३१ चेंडूत २१० धावा करून बाद झाला.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि ईशान किशन हे मैदानावर उतरले होते. यावेळी धवन ३ धावांवर तंबूत परतला. मात्र, किशन खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघासाठी धावा काढल्या. सध्या भारतीय संघ मजबूत स्थितीत असून विराट कोहलीने देखील शतक झळकावले. त्याने एकदिवसीयमध्ये ७२ वे शतक झळकावले. यावेळी त्याने ८६ चेंडूत १०४ धावा केल्या. या धावा करताना त्याने १ षटकार आणि ११ चौकारही मारले. हे त्याचे आतापर्यंतचे चौथे अर्धशतक होते. या अर्धशतकासह त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. सध्या तो ही शतकाच्या जवळ आहे.
किशन हा बांगलादेशमध्ये अर्धशतक करणारा युवा भारतीय सलामीवीर ठरला. त्याने हे अर्धशतक २४ वर्षे आणि १४५ दिवसांच्या वयात ठोकले. यासह त्याने या यादीत दुसरे स्थान गाठले. या यादीत अव्वलस्थानी गौतम गंभीर असून त्याने २१ वर्षे आणि १८४ दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक झळकावले होते. तसेच, या यादीतील तिसऱ्या क्रमांकावर विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग असून त्याने २४ वर्षे आणि १७३ दिवसांच्या वयात बांगलादेशमध्ये अर्धशतक केले होते.
कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे मायदेशी परतल्यानंतर सलामीवीर म्हणून ईशान किशन याला संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने करत सुरुवातीला ४९ चेंडूवर अर्धशतक पूर्ण केले होते. त्यानंतरही त्याने आपला खेळ तसाच सुरू ठेवत आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या शतकानंतर त्याचा धावांचा वेग आणखीच वाढला. त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढत १३१ चेंडूवर २४ चौकार व १० षटकारांच्या मदतीने २१० धावा पूर्ण केल्या आणि तो बाद झाला. सामन्यात द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला. तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात वेगवान द्विशतक ठरले.
भारताकडून द्विशतक झळकवलेले खेळाडू
सचिन तेंडूलकर – २००
वीरेंद्र सेहवाग – २१९
रोहित शर्मा – २६४. २०९ आणि २०८
इशान किशन- २१०