चट्टोग्राम येथे खेळल्या जात असलेल्या बांगलादेश विरुद्ध भारत या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना अक्षरशः धावांचा पाऊस‌ पाडला. बांगलादेशविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या एकदिवसीयमध्ये अखेरच्या सामन्यात भारताने तब्बल २२७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. मात्र मालिका २-१ने गमावली. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. इशान किशनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. मेहिदी हसन मिराजला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्याने भारतीय संघासाठी हा सामना प्रतिष्ठेचा बनला होता. नाणेफेक जिंकून बांगलादेशचा कर्णधार लिटन दास याने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिखर धवन केवळ तीन धावा करून माघारी परतल्यानंतर ईशान किशन व विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी विरोधी संघाच्या फलंदाजांना अक्षरक्ष: गुडघे टेकण्यास भाग पाडले.

ईशानने ८५ चेंडूवर आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. मात्र, यानंतरही तो अजिबात थांबला नाही. त्याने आणखी आक्रमक पवित्रा घेत आपल्या शतकाला द्विशतकामध्ये परिवर्तित केले. ईशानने बाद होण्यापूर्वी १३१ चेंडूचा सामना करताना २१० धावा केल्या. यामध्ये २४ चौकार व १० षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या बाजूने विराटने संयम व आक्रमण यांचा सुरेख मेळ साधत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील ७२ वे शतक पूर्ण केले. त्याने बाद होण्यापूर्वी ९१ चेंडूवर ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ११३ धावा केल्या.

हेही वाचा: IND vs BAN 3rd ODI: जय-वीरूची जोडी! इशान किशन आणि विराट कोहलीने रचला नवा इतिहास

या दोघांव्यतिरिक्त मध्यफळीतील इतर फलंदाज धावांसाठी संघर्ष करताना दिसले. श्रेयस अय्यर ३ तर कर्णधार राहुल केवळ आठ धावा करू शकला. अक्षर पटेलने २० व वॉशिंग्टन सुंदर याने आक्रमक ३७ धावा चोपत भारतीय संघाला निर्धारित ५० षटकात ८ बाद ४०९ अशी मजल मारून दिली. बांगलादेशसाठी तस्किन अहमद, इबादत हुसेन व शाकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले. बांगलादेशकडून शाकीब, इबाबादत हुसेन आणि तस्कीन हुसेन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मुस्तफिजूर आणि मेहदी हसन याने १-१ गडी बाद केला.

हेही वाचा: IND vs BAN 3rd ODI: विक्रमांचा बादशाह! बांगलादेशविरुद्धच्या द्विशतकाने इशान किशनने काढले अनेक विक्रम मोडीत

४१० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या बांगला टायगर्स यांना फार काही करता आले नाही. अवघ्या ५० धावात त्यांनी २ गडी आबाद केले होते. बांगलादेशकडून शाकीब अल हसन सोडता बाकी कोणालाही चाळीसी पार करता आली नाही. त्याने ५० चेंडूत ४३ धावा केल्या. भारताकडून शार्दूल ठाकूरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अक्षर पटेल ने २ गडी बाद केले. बाकी इतर गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद करत त्यांना मोलाची साथ दिली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 3rd odi india beat bangladesh by 227 runs but lost the series 2 1 avw
Show comments