बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला आहे. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमानांची सुरुवात चांगली झाली आणि मेहदी हसन मिराजने शिखर धवनला वैयक्तिक ३ धावांवर तंबूत पाठवले. मात्र त्यानंतर विराट कोहली आणि युवा सलामीवीर इशान किशन यांच्यात विक्रमी भागीदारी झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जखमी झाला. त्याच्या जागी इशान किशनला तिसऱ्या सामन्यात सलामी देण्याची संधी मिळाली. बांगलादेशविरुद्ध इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वात मोठी भागीदारी केली आहे. ८ वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली यांच्यात २१३ धावांच्या भागीदारीचा विक्रम होता पण या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम उद्ध्वस्त केला आहे. बांगलादेशविरुद्ध भारताकडून कोणत्याही विकेटसाठी इशान किशन आणि विराट कोहली यांनी सर्वाधिक धावांची भागीदारी केली आहे. #IshanKishan आणि #ViratKohli मधील भागीदारी भारतासाठी तिसरी सर्वोच्च आणि एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सातव्या क्रमांकाची सर्वोच्च भागीदारी आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये बांगलादेशविरुद्धच्या सर्वोत्तम पाच भारतीय भागीदारी

इशान किशन आणि विराट कोहली यांनी २१३ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे. पण टीम इंडियाच्या वतीने बांगलादेशविरुद्ध अनेक फलंदाजांनी मोठ्या भागीदारी केल्या, ज्यामध्ये इशान किशन आणि विराट कोहली पहिल्या क्रमांकावर आहेत आणि अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन फलंदाजांमध्ये २१३ धावांची भागीदारी झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग आणि विराट कोहली यांच्यात २०३ धावांची भागीदारी झाली, तर चौथ्या क्रमांकावर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी २०१९ विश्वचषक स्पर्धेत १८० धावांची भर घातली. आणि पाचव्या क्रमांकावर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी १७८ धावांची नाबाद भागीदारी केली. विशेष म्हणजे सर्वोत्तम पाच भागीदारीपैकी विराट कोहलीचे योगदान चार भागीदाऱ्यांमध्ये आहे.

हेही वाचा:   IND vs BAN 3rd ODI: विक्रमांचा बादशाह! बांगलादेशविरुद्धच्या द्विशतकाने इशान किशनने काढले अनेक विक्रम मोडीत

भागीदारीच्या बाबतीत विराट- इशानने १९९८ मधील सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांच्या श्रीलंकेविरुद्ध केलेल्या २५२ धावांची भागीदारीचा विक्रम मोडला. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली. संघातील स्थान पक्के करण्याची हिच ती वेळ… असे मनाशी ठाम करून इशानने बांगलादेशच्या गोलंदाजांची बिन पाण्याने धुलाई केली. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून ५०+ धावा करणारा इशान हा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. गौतम गंभीरने २१ वर्ष व १८४ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. इशान आता २४ वर्ष व १४५ दिवसांचा आहे आणि त्याने वीरेंद्र सेहवागचा ( २४ वर्ष व १७३ दिवस) विक्रम मोडला.