भारत आणि बांगलादेश या संघात एकदिवसीय मालिकेचा तिसरा सामना चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. भारतीय संघ या मैदानावर पहिल्यांदा खेळतोय. या आधी २००७मध्ये या मैदानावर खेळण्याचा मुहुर्त ठरला होता. मात्र, पावसाच्या वत्ययामुळे एकही चेंडू न फेकता सामना रद्द करण्यात आला होता. आता जेव्हा भारतीय संघ एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा असे काहीतरी घडले जे भारताच्या क्रिकेटच्या इतिहासात ११ वर्षांनी बघायला मिळाले.

११ वर्षांआधी जेव्हा ही घटना घडली तेव्हा मैदान वेस्ट इंडिजचे होते आणि आता ११ वर्षांनंतर मैदान बांगलादेशचे आहे. दोन्ही ठिकाणी एकच साम्य बघायला मिळते, ते म्हणजे शिखर धवन आणि ती घटना होती भारताच्या क्रिकेट इतिहासात दोनही सलामीवीर डावखुरे खेळवण्याची. ११ वर्षांआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्ध दोन्ही सलामीवीर डावखुरे उतरवले होते.

What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : संजय राऊत यांची टीका, “सैफ अली खानवर हल्ला होणं ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
sharad pawar slams amit shah news in marathi
देशाचे पहिले तडीपार गृहमंत्री! शरद पवारांचा अमित शहांवर प्रतिहल्ला
Walmik Karad wife reaction On Mcoca
“मनोज जरांगे समाजकंटक, त्यानं..”, वाल्मिक कराडच्या पत्नीचा आक्रोश; बजरंग सोनवणे, अंजली दमानियांवर केले आरोप
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
West Bengal vs Odisha on tigers
West Bengal vs Odisha on Tigers : वाघांच्या मुद्द्यावर पश्चिम बंगाल विरुद्ध ओडिशा संघर्ष… यापूर्वीही प्राण्यांवरून जगभरात झालेत वाद
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे

बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशान किशनने अनेक इतिहास रचले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा तो चौथा भारतीय ठरला आहे. इशान किशनने केवळ १२६ चेंडूत २०० धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २३ चौकार आणि ९ षटकार निघाले. या द्विशतकासह ईशान किशनने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये इशान किशनच्या आधी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि रोहित शर्मा यांनी द्विशतके झळकावली आहेत. मात्र, इशानने केवळ १२६ चेंडूत द्विशतक झळकावले. १३१ चेंडूत २१० धावा करून तो बाद झाला. आपल्या झंझावाती खेळीत त्याने २४ चौकार आणि १० षटकार मारले.

द्विशतक झळकावणारा युवा फलंदाज ठरला. त्याने २४ व र्ष व १४५ दिवसांचा असताना हा पराक्रम करताना रोहितचा (२६ वर्ष व १८६ दिवस) विक्रम मोडला. इशान १३१ चेंडूंत २४ चौकार व १० षटकारांसह २१० धावांवर बाद झाला. मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने आज दाखवून दिले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला अन् इशानची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली. संघातील स्थान पक्के करण्याची हिच ती वेळ… असे मनाशी ठाम करून इशानने बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. बांगलादेशमध्ये एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून ५०+ धावा करणारा इशान हा दुसरा युवा भारतीय फलंदाज ठरला. गौतम गंभीरने २१ वर्ष व १८४ दिवसांचा असताना हा पराक्रम केला होता. इशान आता २४ वर्ष व १४५ दिवसांचा आहे आणि त्याने वीरेंद्र सेहवागचा ( २४ वर्ष व १७३ दिवस) विक्रम मोडला.

हेही वाचा: IND vs BAN 3rd ODI: पठ्ठ्याने मैदान मारलं! इशान किशन थाटात द्विशतकीय क्लबमध्ये दाखल

इशानने ८५ चेंडूंत मर्यादित षटकांच्या सामन्यातील पहिले शतक झळकावले. २००३ साली युवराज सिंगने बांगलादेशविरुद्ध पदार्पणाच्या डावात शतक झळकावले होते आणि त्यानंतर इशान हा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. इशान किशनने १०३ चेंडूंत आज हा टप्पा ओलांडताना वीरेंद्र सेहवागचा २०११ साली ( ११२ चेंडू वि. वेस्ट इंडिज) नोंदवलेला विक्रम मोडला. रोहितने ११७ चेंडूंत ( वि. वेस्ट इंडिज, २०१८) व सचिन तेंडुलकर ११८ चेंडू ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१०) चा सामना करताना हा विक्रम केला होता.

कोणतेही शतक न करता थेट द्विशतक झळकावणारा युवा इशान किशन हा पहिलाच जगातील आणि भारतातील फलंदाज ठरला आहे. पहिल्या ३० षटकांत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये इशानने १७९* धावांसह दुसरे स्थान पटकावले. या विक्रमात ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज शेन वॉटसन ( १८५* वि. बांगलादेश, २०११) अव्वल स्थानी आहे. क्विंटन डी कॉकने २०१६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६६ धावा केल्या होत्या आणि त्याआधी हर्षल गिब्सने २००६मध्ये ऑसींविरुद्ध १५६ धावा चोपल्या होत्या.

हेही वाचा: FIFA WC 2022: ‘फिफाने याकडे लक्ष द्यावे…’, उपांत्य फेरी गाठल्यानंतर लिओनेल मेस्सी रेफ्रींवर भडकला

इशानने सर्वोत्तम वैयक्तिक खेळीचा विक्रम नावावर करताना ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा ( १८५*) २०११ सालचा विक्रम मोडला. विराटने २०१२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध १८३ आणि लिटन दासने २०२०मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १७६ धावा केल्या होत्या. भागीदारीच्या बाबतीत विराट- इशानने १९९८ मधील सौरव गांगुली व सचिन तेंडुलकर यांच्या श्रीलंकेविरुद्ध केलेल्या २५२ धावांची भागीदारीचा विक्रम मोडला. विराट व इशान यांनी १९० चेंडूंत २९० धावांची भागीदारी केली.

Story img Loader