IND vs BAN Sanju Samson highest strike rate by wicket keeper in T20I century : हैदराबादमध्ये संजू सॅमसनने ज्या प्रकारची फलंदाजी केली, ती अतुलनीय होती. संजूने या सामन्यात तुफानी खेळी साकारताना ४७ चेंडूत १११ धावा केल्या, जी त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. संजू हा भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. त्याचबरोबर तो भारतासाठी यष्टीरक्षक म्हणून टी-२० मध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा फलंदाज ठरला. तसेच तो टी-२० क्रिकेटमध्ये खास शतक करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने क्विंटन डी कॉकचा विक्रम मोडला.

संजू सॅमसनने मोडला क्विंटन डी कॉकचा विक्रम –

संजू आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने शतक झळकावणारा जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. त्याने या बाबतीत इशान किशनलाही मागे टाकताना क्विंटन डी कॉकचा विक्रम मोडला. संजूने बांगलादेशविरुद्ध ४७ चेंडूत ८ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने ११ धावा केल्या. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट २३६.७१ होता. क्विंटन डी कॉकने २०२३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २२७.२७ च्या स्ट्राइक रेटने शतक झळकावले होते, तर ब्रेंडन मॅक्क्युलम या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे, जोस इंग्लिश चौथ्या स्थानावर आहे तर फिल सॉल्ट पाचव्या स्थानावर आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्ट्राइक रेटने शतक झळकावणारे यष्टीरक्षक :

  • २३६.१७ – संजू सॅमसन विरुद्ध बांगलादेश (२०२४)
  • २२७.२७ – क्विंटन डी कॉक विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२३)
  • २१२.०६ – ब्रेंडन मॅक्क्युलम विरुद्ध बांगलादेश (२०१२)
  • २१०.२० – जोश इंग्लिस विरुद्ध स्टॉटलंड (२०२४)
  • २०८.७७ – फिल सॉल्ट विरुद्ध वेस्ट इंडिज (२०२३)

हेही वाचा – PAK vs ENG: बाबर आझमची इंग्लंडविरूद्धच्या कसोटी संघातून हकालपट्टी, बाबरसह अनेक स्टार खेळाडूंना दिला डच्चू, कसा आहे नवा संघ?

संजूने इशान किशनलाही टाकले मागे –

संजू सॅमसन हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याबरोबर यष्टीरक्षक म्हणून तो क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, ज्याने यष्टिरक्षक म्हणून ८९ धावांची खेळी केली होती, मात्र आता संजू सॅमसन १११ धावांसह पहिल्या स्थानावर आला आहे. या यादीत ६५ धावांची नाबाद खेळी करणारा ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – IND-W vs AUS-W Highlights : ऑस्ट्रेलियाने रोमांचक सामन्यात भारताचा उडवला धुव्वा, टीम इंडिया कशी पोहोचणार उपांत्य फेरीत? जाणून घ्या

भारतीय यष्टिरक्षकाने केलेली सर्वोच्च टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या :

१११ धावा – संजू सॅमसन
८९ धावा – इशान किशन<br>६५* धावा – ऋषभ पंत
५८ धावा – इशान किशन
५८ धावा – संजू सॅमसन