टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो कारण तो अंगठ्याच्या दुखापतीतून बरा होत असून दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत विद्यमान सलामीवीर केएल राहुल किंवा शुबमन गिल यापैकी एकाला त्यांची जागा सोडावी लागेल. आता प्रश्न असा आहे की या कसोटी सामन्यात कर्णधारपद भूषवणारा केएल राहुल दुसऱ्या कसोटीतून बाहेर होणार की शतक झळकावणारा शुबमन गिल? मात्र गिलने शतक झळकावले आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघ व्यवस्थापनाकडे प्लेइंग इलेव्हन निश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ आहे, परंतु भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांचे मत आहे की केएल राहुल आणि शुबमन गिल यांच्यामध्ये कोण बसेल? सोनी स्पोर्ट्स नेटवर्कशी बोलताना मांजरेकर म्हणाले की, संघ व्यवस्थापन राहुलला बाहेर सोडणार नाही, पण शतक झळकावणारा शुबमन गिल बाहेर बसेल. मात्र हा त्याच्यावर अन्याय असेल असे त्यांनी पुढे बोलताना म्हटले.”

हेही वाचा: IND vs BAN 1st TEST: विराटकडून झेल सुटला.. ऋषभ पंतने चपळाई दाखवत पकडला! अन् केएल राहुलचा जीव भांड्यात पडला

“रोहित शर्मा जरी कर्णधार असेल तरी देखील तो कर्णधार आहे म्हणून त्याला कुठल्याही चांगल्या खेळीविना संघात स्थान देणे हे अयोग्य आहे.”असेही ते म्हणाले. मांजरेकर म्हणाले, “या व्यक्तीने (शुबमन गिल) शतक ठोकले आहे, तो चांगला खेळत आहे. कल्पना करूया की रोहित शर्मा तंदुरुस्त आहे, केएल राहुल आणि रोहित तुमचे पहिले पसंतीचे सलामीवीर आहेत, तर तुमच्याकडे रोहित शर्मा असणे आवश्यक आहे.” मात्र शुबमन गिलला बाहेर बसवणे हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे. केएल राहुलला आवश्यक असलेल्या धावा मिळत नाहीत, पण रोहित केएल राहुलला सोडणार नाही. शुबमन गिलला कदाचित बाहेर बसावे लागेल. अजिंक्य रहाणे, त्याच्यासोबत असे एकदा झाले होते, मला वाटते. यापूर्वीही असे घडले आहे. भारतीय क्रिकेटमध्ये.आणि यावर भारतीय संघ व्यवस्थापनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.”

रोहितच्या पुनरागमनामुळे संघ व्यवस्थापनाला निर्णय घेणे कठीण होणार आहे कारण चेतेश्वर पुजाराने आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले असून, पहिल्या डावात ३९ धावा आणि दुसऱ्या डावात शतक झळकावले. अशा परिस्थितीत रोहितसाठी मार्ग काढण्यासाठी गिल किंवा राहुलला बाहेर बसावे लागेल, कारण विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आणि ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर खेळणार आहे, तर सहाव्या क्रमांकासाठी श्रेयस अय्यरचे नाव अंतिम आहे.

हेही वाचा: FIFA World Cup Final: मेस्सीच्या अर्जेंटिनाविरुद्ध भिडण्याआधी फ्रान्सच्या संघातील अनेक स्टार खेळाडू व्हायरसच्या जाळ्यात

विशेष म्हणजे, मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये केएल राहुलने ७३ धावांची खेळी केली. यानंतर दुसऱ्या सामन्यात १४ आणि तिसऱ्या सामन्यात ८ धावा करून तो बाद झाला. पहिल्या कसोटीतही राहुलला विशेष काही करता आले नाही. त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याच्यावर अनेकदा टीका झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban after rohits comeback who will india field from shubman rahul sanjay manjrekar lashed out at the team management avw