IND vs BAN Champions Trophy Match Updates in Marathi: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील भारतीय संघ पहिला सामना बांगलादेशविरूद्ध खेळणार आहे. भारतीय संघाने नाणेफेक गमावली असून संघ प्रथम गोलंदाजीसाठी उतरला आहे. या सामन्यात भारताने दणक्यात सुरूवात केली असून बांगलादेशच्या खेळाडूंना मैदानात फार काळ टिकू दिलं नाही आणि झटपट विकेट घेत निम्मा संघ तंबूत धाडला. पण यादरम्यान रोहित शर्मामुळे अक्षर पटेलची हॅटट्रिक हुकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबईत बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या पहिल्या सामन्यात फिरकीपटू अक्षर पटेल आपली हॅटट्रिक पूर्ण करण्याच्या जवळ होता पण कर्णधार रोहितने अतिशय सोपा झेल सुटला आणि अक्षर पटेल इतिहास लिहिण्यापासून एक पाऊल मागे राहिला.

प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीम इंडियासाठी मोहम्मद शमी आणि हर्षित राणा यांनी सुरुवातीला ३ विकेट घेत दणक्यात सुरुवात करून दिली. यानंतर रोहित शर्माने नवव्या षटकात फिरकी विभागाकडे मोर्चा वळवला. रोहितने अक्षर पटेलला गोलंदाजी सोपवली आणि अक्षरने चोख कामगिरी बजावली. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात कहर करत बांगलादेशाला धक्के दिले.

अक्षर पटेलने नवव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर एकही धाव दिली. दुसऱ्या चेंडूवर अक्षरने सलामीवीर तन्झीद हसनला झेलबाद केले. केएल राहुलने एक शानदार झेल टिपला आणि बॅटच्या कडेला चेंडू लागल्याचे त्याने म्हणत पंचांकडे अपील केले. काही सेकंदांत पंचांनीही बाद असल्याचा इशारा केला. यानंतर दुसऱ्याच चेंडूवर संघाचा अनुभवी खेळाडू मुश्फिकूर रहीम आला आणि अक्षरने त्याला चकमा देत पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता झेलबाद केले.

रोहित शर्मानं सोप्पा झेल सोडल्याने अक्षर पटेलची हुकली हॅटट्रिक

यासह अक्षर पटेलने सलग दोन चेंडूत दोन विकेट घेतले. अक्षर हॅटट्रिकसाठी तयार होता आणि त्याने तसा उत्कृष्ट चेंडूही टाकला. रोहितने स्लिपमध्येही फिल्डर उभे केले होते, ज्यात तो स्वत: पहिल्या स्लिपमध्ये होता. जाकेर अलीच्या बॅटची कड घेत अगदी रोहित शर्माच्या जवळ चेंडू आला आणि रोहित झेल टिपायला जाणार तितक्यात घाईत चेंडू हातात न येता खाली पडला आणि तो झेल सुटला. यानंतर कॅच ड्रॉप झाल्याचे पाहताच त्याने जमिनीवर हात आपटत स्वत:वर राग काढला. सर्वच जण रोहितने सोडलेला झेल पाहून अवाक् झाले. रोहित शर्माने मागे फिरत अक्षर पटेलची माफीदेखील मागितली.

रोहितच्या त्याच्या या चुकीवर कोणत्याही भारतीय खेळाडूचा विश्वास बसत नव्हता. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनाही धक्का बसला. कर्णधार रोहित स्वतःवरच खूप रागावला आणि जमिनीवर जोरात हात आपटायला लागला आणि मग हात जोडून अक्षराची माफी मागितली. अक्षरही डोक्यावर हात ठेवून निराशा व्यक्त करत होता. अक्षर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात हॅट्ट्रिक घेणारा पहिला भारतीय आणि दुसरा गोलंदाज बनू शकला असता पण ही संधी त्याच्या हातून निसटली.