IND vs BAN, Asia Cup 2023: आज आशिया चषक २०२३चा शेवटचा सुपर-४ सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. भारतीय संघ या स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. १७ सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या फायनलपूर्वी तयारी म्हणून टीम इंडिया हा सामना पाहणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २६५ धावा केल्या. शाकिब अल हसनने कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येनजीक नेले.

भारतीय संघासाठी बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी खेळला जात असलेला सामना फार महत्वाचा नाही. कारण, संघाने आधीच आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात स्थान पक्के केले आहे. असे असले तरी अष्टपैलू रविंद्र जडेजा याच्यासाठी बांगलादेशविरुद्धचा हा सामना महत्वाचा ठरला. जडेजाने आपल्या २०० एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्स पूर्ण केल्याच, पण एका खास विक्रमात कपिल देव यांच्या पावलावर पाऊल टाकले.

BCCI in Action Mode After India Streak Ending Defeat in Pune said No Optional Training Ahead of IND vs NZ Mumbai Test
IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
India Suffered Humiliating Defeat Against New Zealand on Home Ground After 12 Years What Are The Reasons IND vs NZ
IND vs NZ: रोहित-विराट अपयशी, आततायी फटकेबाजी… पुण्यात न्यूझीलंडने भारताचा विजयरथ कसा रोखला? पराभवाची ५ कारणं
IND vs NZ India lost a Test series at home after 12 years
IND vs NZ : पुण्यात पानिपत; १२ वर्षानंतर भारतीय संघाने मायदेशात गमावली कसोटी मालिका
IND vs NZ Ravindra Jadeja cleverly run out William O Rourke in Pune test
IND vs NZ : वॉशिंग्टन सुंदरच्या अचूक थ्रोवर रवींद्र जडेजाने हुशारीने विल्यम ओ रुकला केले रनआऊट, VIDEO व्हायरल
How Can India Qualify to WTC Final If They Lose 2nd Test Against New Zealand in Pune What is The Equation IND vs NZ
IND vs NZ: भारताला सलग दुसरा कसोटी सामना गमावल्यास बसणार धक्का, WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कसं असणार समीकरण?
afghanistan emerging team
ACC Emerging Asia Cup: अफगाणिस्तानने युवा टीम इंडियाला दिला पराभवाचा धक्का; जेतेपदाचं स्वप्न भंगलं
india new zealand second test cricket match from today
भारताचे मालिकेत बरोबरीचे लक्ष्य; न्यूझीलंडविरुद्ध दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून; खेळपट्टीचे स्वरूप गुलदस्त्यात

अष्टपैलू रविंद्र जडेजा याने बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात शमीम हुसेन याला पायचीत पकडले. बांगलादेशच्या डावातील ३५व्या षटकात त्याला ही विकेट मिळाली. वन डे क्रिकेटमधील जडेजाची ही २००वी विकेट होती. अष्टपैलू जडेजा याने फलंदाज म्हणून एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८१ सामन्यांमधील १२३ डावांमध्ये २५७८ धावा केल्या आहेत. माजी दिग्गज कपिल देव यांच्यानंतर जडेजा केवळ दुसरा भारतीय खेळाडू आहे, ज्याने वन डे क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून २००० धावा आणि गोलंदाजी करताना २०० विकेट्स घेतल्या आहेत. कपिल देव यांनी आपल्या वन डे कारकिर्दीत २२५ सामने खेळले. यापैकी २२१ सामन्यांमध्ये त्यांना २५३ विकेट्स मिळाल्या, तर फलंदाजी करताना ३७८३ धावा केल्या.

बांगलादेशने २६५ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने आठ विकेट गमावून २६५ धावा केल्या. कर्णधार शाकिब अल हसनने सर्वाधिक ८० धावांचे योगदान दिले. तौहीद हृदयॉयने ५४ आणि नसूम अहमदने ४४ धावा केल्या. भारताकडून शार्दुल ठाकूरने तीन आणि मोहम्मद शमीने दोन विकेट्स घेतल्या. प्रसिद्ध, अक्षर आणि जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

हेही वाचा: IND vs PAK: भारत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळणार का? अनुराग ठाकूरांचे मोठे विधान; म्हणाले, “जोपर्यंत सीमेपलीकडून…”

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, तिलक वर्मा, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, प्रसीध कृष्णा, मोहम्मद शमी.

बांगलादेश: तनजीद हसन तमीम, लिटन दास (विकेटकीपर), अनामूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहदी हसन मिराज, मेहदी हसन, नसुम अहमद, तन्झिद हसन शाकिब, मुस्तफिजुर रहमान.