रविवारी भारत आणि बांगलादेश संघातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पार पडला. शेर-ए-बांगला स्टेडियम, ढाका येथे झालेल्या सामन्यात बांगलादेशने १ विकेटसने शानदार विजय मिळवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४१.२ षटकात सर्वबाद १८६ धावा केल्या होत्या. त्यामुळे बांगलादेश १८७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठला करताना बांगलादेश संघाने ४६ षटकांत ९ बाद १८७ धावा केल्या. मेहदी हसन मिराजची ३१ धावांची नाबाद खेळी निर्णायक ठरली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१८७ धावांच्या आव्हानाला प्रत्यत्तर द्यायला उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात देखील भारताप्रमाणे खराब झाली. या संघाला पहिला धक्कास पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरच बसला. नजमुल हुसेन शांतो पहिल्या विकेट्सच्या रुपाने शून्यावर बाद झाला. त्यानंतर अनामूल हक (१४) देखील लवकर बाद झाला. त्यानंतर कर्णधार लिटन दास आणि शाकिबने संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेट्साठी ४८ धावांची भागीदीरी केली. त्यानंतर लिटन दास ६३ चेंडूत ४१ धावा करुन बाद झाला. तसेच शाकिबने २९ धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना काही खास खेळी करता आली नाही. भारताकडून गोलंदाजी करताना, मोहम्मद सिराजने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.

त्तत्पुर्वी भारतीय संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी करणे स्विकारले होते. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय संघाला पहिला धक्का शिखर धवनच्या रुपाने बसला. तो १७ चेंडूत ७ धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट आणि रोहित भारतीय संघाचा डाव सावरतील असे वाटले होते. परंतु फिरकीपटू शाकिब अल हसनने या दोन प्रमुख फलंदाजांना, आपल्या एकाच षटकात तंबूचा रस्ता दाखवला. ज्यामध्ये रोहितला २७ तर विराटला फक्त ९ धावा करत परतले.

हेही वाचा – PAK vs ENG 1st Test: जो रूटने आंतरराष्ट्रीय मॅचला बनवले गल्ली क्रिकेट, पाकविरुद्ध डाव्या हाताने केली फलंदाजी, पाहा व्हिडिओ

दरम्यान, अशा अवस्थेत भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुलने भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. राहुलने ७० चेंडूचा सामना करताना ५चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ७३ धावा केल्या. तो इबादत हसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याचबरोबर श्रेयसने २४ आणि वाशिंग्टन सुंदरने १९ धावांचे योगदान दिले. भारताच्या इतर फलंदाजांना साधा दुहेरी आकडा गाठता आला नाही. बांगलादेशकडून शाकिबने सर्वोत्तम गोंलदाजी केली. त्याने १० षटकात ३६ धावा देत ५ गडी बाद करत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. यामध्ये त्याने दोन षटके निर्धाव टाकली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban bangladesh beat india by one wicket in the first odi match vbm