IND vs BAN 2nd Test Mehidy Hasan Miraz Stung by Wasp : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने पहिल्या डावात सर्वबाद २३३ धावा केल्या. बांगलादेशसाठी मोमिनुल हकने सर्वाधिक १०७ धावांचे योगदान दिले. दरम्यान कसोटीच्या चौथ्या दिवशी एक विचित्र घटना पाहायला मिळाली. बांगलादेशचा क्रिकेटपटू मेहदी हसन मिराजवर फलंदाजी करताना गांधीलमाशीने हल्ला केला. चौथ्या दिवशी लंच ब्रेकच्या आधी ही घटना घडली.

गांधीलमाशीने मेहदी हसन मिराजला डंक मारला –

लंच ब्रेकच्या १५ मिनिटे आधी सामना थोडावेळ थांबला होता, तेव्हा मिराजला पॅड घातलेले असतानाही त्याच्या गुडघ्याला गांधीलमाशी चावली असल्याचे दिसून आले. याबाबत कॉमेंट्री करत असलेल्या मुरली कार्तिकने ही माहिती दिली. यानंतर बांगलादेशच्या फिजिओने मेहदी हसन मिराजवर मैदानात उपचार केले. तसेच त्याचा गुडघा थंड पाण्याने धुतला. ज्यानंतर फारसा त्रास होत नसल्याने मिराजने फलंदाजी सुरूच ठेवली. चौथ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत बांगलादेशने ६ गडी गमावून २०५ धावा केल्या होत्या. मोमिनुल हकने शानदार शतक झळकावले. त्याने १७६ चेंडूत १०२ धावा केल्या आणि मेहदी हसन मिराजने ६ धावा केल्या.

Ravindra Jadeja Completes 300 Test Wickets Becomes First Indian Left Arm Spinner to Achieve Feat IND vs BAN
IND vs BAN: ३०० पार… रवींद्र जडेजाने कसोटीमध्ये घडवला इतिहास, ही कामगिरी करणारा भारताचा पहिलाच फिरकी गोलंदाज
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’,…
Rohit Sharma One Hand Stunning Catch of Litton Das Left Everyone Shocked in IND vs BAN Watch Video
IND vs BAN: रोहित शर्माचा हवेत झेपावत एकहाती झेल; गिलने धरलं डोकं तर कोच झाले चकित, पाहा VIDEO
Actor Shahrukh Khan compares himself to MS Dhoni
‘नाही नाही म्हणत धोनी १० आयपीएल खेळतो…’, अभिनेता शाहरुख खान माहीबद्दल असं का म्हणाला? पाहा VIDEO
Who is Team India Ghajini Rohit Sharma Reveal The Name Suryakumar Yadav Reaction in Kapil Sharma Show Watch Video
VIDEO: “टीम इंडियाचा गजनी कोण?”, रोहित शर्माचं खरं उत्तर, तर सूर्यकुमारची प्रतिक्रिया पाहून आवरणार नाही हसू…
IPL Auction 2025 Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma
‘रोहित शर्माला कर्णधार म्हणून घ्या…’, मोहम्मद कैफने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणाला दिला सल्ला? पाहा VIDEO
T20 World Cup INDW beat WIW by 20 Runs in Womens World Cup Warm Up Match
Women’s T20 World Cup: T20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची जोरदार तयारी, पहिल्या सराव सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनचा केला पराभव; जेमिमा-पूजाची चमकदार कामगिरी
SA vs IRE 2nd T20 Highlights in Marathi
SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे

मिराजची मोमिनुलसोबत ५४ धावांची भागीदारी –

शकीब अल हसन बाद झाल्यानंतर मेहदी हसन मिराज फलंदाजीला आला होता. त्याने मोमिनुलसोबत ५४ धावांची भागीदारी केली. उपाहारानंतर तो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर बाद झाला. मिराजने ४२ चेंडूत २० धावा केल्या. तो बाद झाला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या ७ बाद २२४ धावा होती. यानंतर बांगलादेश संघाचा पहिला डाव काही मिनिटांतच संपुष्टात आला. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर सिराज, अश्विन आणि आकाशदीप यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तसेच रवींद्र जडेजाने एक विकेट्स घेतली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ३०० विकेट्स पूर्ण केल्या.

हेही वाचा – ‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

रवींद्र जडेजाच्या कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण –

रवींद्र जडेजाने खलीद अहमदला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केले आणि कसोटी क्रिकेटमधील ३०० वी विकेट मिळवली. या विकेटसह रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेणारा भारताचा पहिला डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला आहे. जागतिक क्रिकेटमध्ये, इंग्लंडच्या इयान बोथमने ७२ कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला होता आणि सर्वात कमी सामन्यांमध्ये हा टप्पा गाठणारा जडेजा हा त्याच्यानंतरचा खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध सुरू असलेला दुसरा कसोटी सामना जडेजाचा या फॉरमॅटमधील ७३वा सामना आहे.