India vs Bangladesh, World Cup 2023: विश्वचषकाच्या १७व्या सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने आहेत. दोन्ही संघांमधील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करायला उतरला. टीम इंडियाला नवव्या षटकात मोठा धक्का बसला. अष्टपैलू हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान दुखापत झाली. सध्या वैद्यकीय पथक त्याच्या दुखापतीकडे लक्ष देत आहे. त्यानंतरच ती किती गंभीर आहे हे कळेल.
बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर लिटन दासने फ्रंट शॉट खेळला. हार्दिकने पायाने मारलेला फटका रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांच्या पायावर खूप ताण आला. चौथा चेंडू टाकण्यापूर्वी त्याचा पाय मुरगळला. तो खेळपट्टीवरच बसून राहिला आणि रोहित विचारचं करत बसला. हार्दिक हा टीम इंडियाचा प्रमुख अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याला दुखआपतीमुळे गमावणे टीम इंडियाला महागात पडू शकते. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव बदली खेळाडू म्हणून मैदानावर आला आहे. फलंदाजाने मारलेला चेंडू पायाने अडवण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला.
वैद्यकीय पथकाने मैदानावर हार्दिकवर उपचार केले. तो गोलंदाजी करायलाही उभा राहिला, पण धावू शकला नाही. हार्दिकला बाहेर जावे लागले. त्याच्या जागी विराट कोहलीने ओव्हर पूर्ण केले. हार्दिकने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याला धावता येत नव्हते. कर्णधार रोहित शर्माने अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीशी संवाद साधला. दोघांनीही रिस्क न घेण्याचे ठरवले. कोहली आणि रोहितने हार्दिकशी बोलून त्याला मैदान सोडण्यास सांगितले. हार्दिकने गोलंदाजीचा हट्ट सोडला आणि तो वैद्यकीय पथकासह बाहेर पडला.
बांगलादेशची धावसंख्या शंभरी पार
१८ षटकांनंतर बांगलादेशने एक विकेट गमावून १०३ धावा केल्या आहेत. लिटन दास ५२ चेंडूत ४४ धावा करत असून नझमुल हुसेन शांतो पाच धावा करत आहे. यापूर्वी कुलदीपने तनजीद हसनला बाद केले होते.
हेही वाचा: IND vs BAN: विश्वचषक २०२३मध्ये बांगलादेशला मोठा धक्का! दुखापतीमुळे शाकिब अल हसन भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर
या सामन्यासाठी दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश: लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), नसुम अहमद, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.