भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी कानपूरमध्ये पार पडली. रोहित शर्माच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ गडी राखून बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. दरम्यान, या सामन्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॅडीनने रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. रोहित आणि त्याचा संघाने कानपूरमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली, तो म्हणाला. तसेच पुढील महिन्यातील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघ अशाच प्रकारे कामगिरी करू शकतो, अशी प्रतिक्रियाही त्याने दिली.

नेमकं काय म्हणाला ब्रॅड हॅडीन?

एका पॉडकास्टमध्ये बोलताना ब्रॅड हॅडीनने रोहित शर्माचं कौतुक केलं. “भारतीय संघाने हा सामना जिंकण्याची संधी निर्माण केली. त्यांचे लक्ष आपण किती धावा करतो, यापेक्षा बांगालदेशच्या संघाला आपण किती कमी वेळात बाद करू शकतो, याकडे होतं. भारतीय संघाने या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. त्यासाठी मी रोहित शर्मा आणि त्यांच्या संघाचे तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन करतो”, असं तो म्हणाला.

हेही वाचा – IND W vs NZ W: “या टप्प्यावर येऊन अशा चुका…”, भारताच्या पराभवानंतर हरमनप्रीत कौरने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

पुढे बोलताना म्हणाला की, “रोहित शर्मा असा खेळाडू आहे, ज्याच्यासाठी संघाचा विजय सर्वात महत्त्वाचा आहे, त्यानंतर इतर तो इतर गोष्टींना प्राधान्य देतो. भारतीय संघानेही त्याच भावनेतून खेळ करत बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. रोहित आणि त्याच्या संघाची क्रिकेट खेळण्याची ही शैली मला खूप आवडली. एकंदरित बांगलादेशबरोबर झालेल्या सामना बघितला तर एकवेळ अशी होती की, हा सामना अनिर्णित राहील, असं वाटत होतं. पण भारतीय संघाने या परिस्थितीतून विजय खेचून आणला. खरं तर टी-२० सामन्यातही खेळाडू एका षटकात १० धावा काढताना थोडा विचार करतो. मात्र रोहितच्या संघाने ते कसोटी सामन्यात करून दाखवलं. त्यामुळे रोहित आणि त्याचा संघाला ‘हॅट्स ऑफ’”

दरम्यान, पुढील वर्षीय ऑस्ट्रेलिया होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय संघा पुन्हा अशी कामगिरी करू शकेन का? असं विचारलं असता, “निश्चित भारतीय संघ पुन्हा ही कामगिरी करू शकतो”, अशी प्रतिक्रिया ब्रॅड हॅडीनने दिली.

हेही वाचा – MUM vs ROI : इराणी चषकात अभिमन्यू ईश्वरनचे हुकले द्विशतक, मग असा काढला राग, पाहा VIDEO

कानपूर कसोटीत भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय

कानपूर कसोटीत बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना ३ गडी गमावून १०७ धावा केल्या. पावसामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी एकही चेंडू टाकता आला नाही, मात्र चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत बांगलादेशला २३३ धावांत गुंडाळले. याला प्रत्युत्तर म्हणून भारताने चौथ्या दिवशी डावाची आक्रमक सुरुवात केली आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद ५०, १०० आणि २०० धावा करण्याचा पराक्रम केला. भारताने पहिला डाव २८५/९ धावांवर घोषित केला.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेशचा संघ केवळ १४६ धावाच करू शकला, त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी ९५ धावांचे लक्ष्य मिळाले. शेवटच्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय डावाची सुरुवात धमाकेदार झाली पण रोहित शर्मा स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला. गिलही ६ धावा करून माघारी परतला. यानंतर विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांनी पदभार स्वीकारला आणि अशा प्रकारे भारताने सामना तसेच मालिकेवर कब्जा केला.