Google wishes Team India for Champions Trophy 2025 IND vs BAN Match : टीम इंडिया आजपासून बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात करत आहे. या सामन्यापूर्वी गुगल इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाला गुगलने बॉलिवूडच्या खास स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. गूगल इंडियाने त्यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून पोस्ट करत, करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील एक दृश्य शेअर केले आहे, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, हृतिक रोशन, काजोल आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते.

टीम इंडियाचा दुबईत कसा आहे रेकॉर्ड?

भारतीय संघाने दुबईमध्ये आतापर्यंत एकूण सहा सामने खेळले आहेत, ज्यापैकी एकाही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलेला नाही. टीम इंडियाने पाच सामने जिंकले आहेत आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. आता जर रोहितची सेना दुबईमध्ये हा विक्रम राखण्यात यशस्वी झाली तर टीम इंडिया चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली असेल.

गुगल इंडियाने आपल्या अधिकृत एक्स हॅन्डलवर पोस्ट करताना लिहिले, “टीम इंडिया के लिए शुभकामनाएं. कह दिया ना, बस कह दिया.” यासोबत फोटो ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील एका सीनचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन थाळी आणि दिवा हातात धरलेल्या दिसत आहेत. फोटोच्यावर लिहिले की, “मैं फिर से इंतज़ार कर रही हूँ, 12 साल बाद.” जे सध्या तुफान व्हायरल होत आहे.

रोहित शर्माचा चॅम्पियन्स ट्रॉफीतील रेकॉर्ड –

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये रोहितचा रेकॉर्ड चांगला आहे. त्याने स्पर्धेत आतापर्यंत १० सामने खेळले आहेत आणि ५३.४४ च्या सरासरीने ४८१ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट ८२.५० राहिला आहे. रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहे. कुमार संगकारा आणि रिकी पॉन्टिंग सारख्या दिग्गजांनीही चार अर्धशतके ठोकली आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर

Story img Loader