बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघाने सलग दुसरा एकदिवसीय सामन्यात पराभव पत्करत मालिका गमावली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका गमावली होती. आता यजमान बांगलादेशने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाविरुद्ध २-० अशी अजेय आघाडी घेतली आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा म्हणजेच तिसरा सामना आता १० डिसेंबर रोजी होणार आहे. मात्र या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन खेळू शकणार नाहीत. तिघेही दुखापतीमुळे बाहेर आहेत.
टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने भारतीय खेळाडूंच्या दुखापतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आपले खेळाडू १०० टक्के तंदुरुस्त आहेत की नाही याचा विचार करण्याची गरज असल्याचे रोहित शर्मा म्हणतो.
मागील सर्व दौऱ्यांप्रमाणेच बांगलादेश मालिकेतही टीम इंडियाचे अनेक खेळाडू जखमी झाले होते. दीपक चहर आणि कुलदीप सेन दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडले आहेत. रोहित शर्माने या प्रकरणावर मौन तोडले आणि म्हणाला की, खेळाडूंची दुखापत हा आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. यावर काम करायला हवे. हे का होत आहे. कदाचित जास्त क्रिकेट खेळल्यामुळे हे होत असेल. पण जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुम्ही १०० टक्क्यांहून अधिक तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
अंजुम चोप्रा यांच्याशी बोलताना, भारतीय कर्णधार रोहितने त्याच्या अंगठ्याच्या दुखापतीबद्दल अपडेट शेअर केले. “तो म्हणाला अंगठ्याची दुखापत फार मोठी नाही. काही त्वचा फाटली असून त्या ठिकाणी काही टाके पडले. सुदैवाने, फ्रॅक्चर नाही आणि त्यामुळे मी फलंदाजी करू शकलो. जेव्हा तुम्ही गेम गमावता तेव्हा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही असतात.
हेही वाचा: IND vs BAN: “जर फलंदाजीला यायचंच होतं तर…” कर्णधार रोहित शर्मावर सुनील गावसकर भडकले
विश्वचषकातही किंमत मोजावी लागली
रोहित शर्माने नॅशनल क्रिकेट अकादमीबद्दल सांगितले आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणाला, “राष्ट्रीय क्रिकेट अकादमीलाही पाहण्याची गरज आहे. आपल्याला संघासोबत बसण्याची गरज आहे. आम्हाला एनसीए देखील पहावे लागेल. त्यांच्यावरील कामाच्या भाराचाही विचार करावा लागेल. खेळाडूंना असे दुखापत होताना आपण पाहू शकत नाही. खेळाडूंच्या वारंवार दुखापतींचे कारण काय, याचा शोध घ्यावा लागेल.” टीम इंडियाला टी२० विश्वचषकामध्ये रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह सारख्या खेळाडूंच्या दुखापतींचा फटका सहन करावा लागला आहे. वेगवान गोलंदाज दीपक चहर या वर्षातील बहुतांश काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे, परंतु असे असूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेला नाही.
तो म्हणाला, “मेहदी हसन आणि महमुदुल्लाह यांनी उत्तम भागीदारी केली, पण अशी भागीदारी तोडण्याचा मार्गही शोधावा लागेल. जेव्हा तुम्ही एकदिवसीय क्रिकेटमध्ये भागीदारी बनवता तेव्हा ती मॅच विनिंग पार्टनरशिपमध्ये बदला. त्याने तेच केले. मधल्या फळीतही धैर्य दाखवण्याची गरज आहे. काही दुखापतींबाबत निश्चितच तणाव आहे आणि त्याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.” कर्णधार रोहित म्हणाला, ‘दुखापतींवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जेव्हा तो भारताकडून खेळतो तेव्हा त्याच्याकडून १०० टक्क्यांहून अधिक अपेक्षा असतात. त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटकडेही लक्ष देण्याची गरज आहे, कारण आपण त्याला देशासाठी अर्धा फिट खेळू देऊ शकत नाही.