Hardik Pandya No look Shots Video Viral During IND vs BAN 1st T20 Match : भारताने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेला शानदार विजयाने सुरुवात केली आहे. भारताच्या भक्कम गोलंदाजीसमोर पाहुणा संघ अवघ्या १२७ धावांत गारद झाला. यानंतर प्रत्युत्तरात भारतीय संघाने अवघ्या ११.५ षटकांत ३ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हार्दिक पंड्याने १६ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी साकारत सामना लवकर संपवला. या खेळीदरम्यानचा त्याचा एक शॉट इतका अप्रतिम होता की ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भारतीय संघाच्या डावातील १२व्या षटकात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या तस्किन अहमदच्या षटकाचा सामना करत होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एक अप्रतिम चौकार मारला. हा शॉट असा होता की ज्यामध्ये त्याचा आत्मविश्वास दिसून येत आला. तस्किन अहमदने टाकलेला चेंडू हार्दिककडे आला, त्याने शरीराच्या जवळून शॉट खेळला आणि नंतर चेंडूकडे ढुंकूनही पाहिले नाही. जो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी गेला. यानंतर पुढच्या चेंडूवर त्याने पुन्हा चौकार मारला. हार्दिक पंड्याने षटकाच्या पाचव्या चेंडूवर दमदार षटकार मारून सामना संपवला.

हार्दिक पंड्याच्या नो लूक शॉट्सचा व्हिडीओ व्हायरल –

टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने १६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. हार्दिकने आतापर्यंत टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ वेळा षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. यासह त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने भारताला टी-२० सामन्यात ४ वेळा षटकार मारून सामना जिंकून दिला होता. आता हार्दिकने कोहलीला मागे टाकले असून तो भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयी षटकार ठोकणारे भारतीय खेळाडू:

हार्दिक पंड्या- ५ षटकार
विराट कोहली- ४ षटकार
एमएस धोनी- ३ षटकार
ऋषभ पंत- ३ षटकार
शिवम दुबे- १ षटकार